scorecardresearch

टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा विदितवर धक्कादायक विजय

चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीने अग्रस्थान कायम राखले आहे.

विक अ‍ॅन झी (हॉलंड) : टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी झालेल्या १०व्या फेरीत भारताच्या आर. प्रज्ञानंदने  ग्रँडमास्टर विदित गुजराथीवर सरशी साधून सलग तीन पराभवांची मालिका संपुष्टात आणली. १६ वर्षीय प्रज्ञानंदने विदितला ७८ चालींपर्यंत लांबलेल्या लढतीत नमवले. त्यामुळे सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असणाºया विदितची स्पर्धेतील दुसºया पराभवामुळे आता थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. 

चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीने अग्रस्थान कायम राखले आहे. अर्जुनने १०व्या फेरीत रशियाच्या पोलिना शुवालोव्हाला बरोबरीत रोखले

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata steel masters chess tournament pragyananda shocking victory over vidit akp

ताज्या बातम्या