आयपीएल २०२२ मध्ये मोठे बदल होणार आहेत. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोने (VIVO) लीगच्या प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सर म्हणून विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार Dream11 ला हस्तांतरित केले गेले.

Why Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Called El Classico
IPL 2024: चेन्नई सुपर किंग्स वि मुंबई इंडियन्सच्या सामन्याला El Classico का म्हणतात? जाणून घ्या
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

हेही वाचा – IPL 2022 पूर्वी लीगच्या सर्वात महागड्या क्रिकेटपटूनं घेतली निवृत्ती; आता बनला ‘या’ संघाचा गुरू!

बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार २०२० हंगामापर्यंत होता आणि एका वर्षाच्या ब्रेकमुळे २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रायोजक म्हणून कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला.

विवोने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत. २०२२च्या हंगामासाठी Dream11 ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. त्याला २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व अधिकार मिळाले. आयपीएल २०२० करोनामुळे यूएईमध्ये खेळवण्यात आले.