scorecardresearch

Premium

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवल्यानंतर बीसीसीआयने कोहली-जडेजाचे केले विशेष अभिनंदन, VIDEO होतोय व्हायरल

Cricket World Cup 2023, IND vs SA: रविवारी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव करत सलग आठवा विजय नोंदवला. या सामन्यात भारतासाठी विराट कोहलीने १०१ धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने ५ विकेट्स घेतल्या.

in IND vs SA Match Updates in marathi
बीसीसीआयकडून जडेजा आणि कोहलीचे कौतुक (फोटो-@mufaddal_vohra)

Team India and officials celebrating Virat Kohli and Ravindra Jadeja’s performance: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३७ वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २४३ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. संघासाठी किंग कोहलीने शानदार फलंदाजी करताना नाबाद शतक झळकावले. यानंतर रवींद्र जडेजान दमदार गोलंगदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयने ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे विशेष अभिनंदन केले.

तत्पूर्वी रवींद्र जडेजाने फलंदाजीतही योगदान दिले होते. त्याने १५ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २९ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना त्याने ९ षटकांत ३५ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन्ही खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी केकही कापण्यात आला. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

IND vs ENG 3rd Test Match Updates in marathi
IND vs ENG : मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, भारताकडे पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी
IND U19 vs AUS U19 ICC
IND vs AUS U19 WC Final : राज लिंबानीचा टिच्चून मारा, हरजस सिंगचं अर्धशतक, ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २५४ धावांचं आव्हान
India has set a target of 398 runs against England in 2nd Test Match
IND vs ENG 2nd Test : भारताने इंग्लंडसमोर ठेवले ३९९ धावांचे लक्ष्य, शुबमन गिलने झळकावले शतक
IND vs NZ Super Six match of U19 World Cup 2024
U19 WC 2024 : मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, न्यूझीलंडसमोर ठेवले २९६ धावांचे लक्ष्य

विराटने आफ्रिकेविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये झळकावले ४९ वे शतक –

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करताना त्याने एकूण १२१ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने ८३.४७ च्या स्ट्राईक रेटने १०१ नाबाद धावा काढल्या. या काळात त्याच्या बॅटमधून १० चौकार आले. या सामन्यादरम्यानच्या खेळीसाठी विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. एवढेच नाही तर या सामन्यादरम्यान त्याने एक विशेष कामगिरी केली. किंग कोहलीने वनडे फॉरमॅटमध्ये सचिनच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी केली आहे. दोन्ही खेळाडूंच्या नावावर आता वनडेत अनुक्रमे ४९-४९ शतके आहेत.

हेही वाचा – IND vs SA: “हा तर प्रत्येक सामन्यात म्हणतो…”; रवींद्र जडेजाच्या डीआरएस मागणीवर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया

एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट्स घेणारा दुसरा फिरकीपटू –

रवींद्र जडेजाने अगोदर फलंदाजीत नाबाद २९ धावांचे योगदान दिले. यानंतर गोलंदाजीत शानदार गोलंदाजी केली. त्याने ३२६ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवून इतिहास रचला. जडेजाने ९ षटकात ३३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या आणि विश्वचषकाच्या इतिहासात ५ विकेट्स घेणारा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला.

हेही वाचा – Ind vs SA: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली-शतकी दीपस्तंभाचे मनसबदार

याआधी युवराज सिंगने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत ही कामगिरी केली होती. गमतीची गोष्ट म्हणजे गेल्या वेळी जेव्हा डावखुरा फिरकीपटू युवराजने विश्वचषकात भारतासाठी ५ विकेट घेतल्या होत्या, तेव्हा तो संघ चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला होता. विश्वचषकात एका डावात ५ बळी घेणारा जडेजा हा केवळ ७वा भारतीय गोलंदाज आहे. याआधी कपिल देव, रॉबिन सिंग, व्यंकटेश प्रसाद, आशिष नेहरा, युवराज सिंग आणि मोहम्मद शमी यांनी ही कामगिरी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Team india and officials celebrating virat kohli and ravindra jadejas performance in ind vs sa match vbm

First published on: 06-11-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×