Rahul Dravid has says KL Rahul will not take wicket keeping : भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मंगळवारी सांगितले की, फलंदाज केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक म्हणून खेळणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून हैदराबाद येथे सुरुवात होणार आहे, तर पुढील चार कसोटी सामने विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला येथे खेळवले जातील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या दोन कसोटीत केएस भरत आणि ध्रुव जुरेल यापैकी एक खेळणार हे निश्चित झाल्याचे द्रविडच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. भरत याआधीही यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे, तर ध्रुवला प्रथमच वरिष्ठ संघात संधी मिळाली आहे. द्रविड म्हणाले की, राहुलने यष्टीमागे चमकदार कामगिरी केली आहे, परंतु असे असतानाही संघात समाविष्ट असलेल्या दोन प्रतिभावान यष्टीरक्षकांपैकी एकाची यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी निवड केली जाईल. दीर्घ मालिका आणि हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे द्रविडने सांगितले.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ‘राहुल मालिकेत यष्टिरक्षक म्हणून खेळणार नाही. मला वाटते की आम्ही निवडीपासूनच याबद्दल अगदी स्पष्ट होतो. आम्ही ही भूमिका निभावू शकतील अशा दोन व्यक्तींची निवड केली आहे. राहुलने दक्षिण आफ्रिकेत आमच्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे आम्हाला ती मालिका अनिर्णित करण्यात मदत झाली, परंतु पाच कसोटी सामने आणि या परिस्थितीत खेळणे लक्षात घेता, यष्टीरक्षक म्हणून निवड आमच्या इतर दोन यष्टीरक्षकांपैकी एकाची केली जाईल.’

हेही वाचा – ICC Test Team : आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर, विराट-रोहित नव्हे तर ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना मिळाले स्थान

भारतीय संघ विराटशिवाय उतरणार मैदानात –

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ स्टार फलंदाज विराट कोहलीशिवाय सामन्यात उतरणार आहे. कारण विराटने वैयक्तिक कारणांमुळे संघातून माघार घेण्याची घेतली आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल, तर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह उपकर्णधाराची भूमिका बजावेल. भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात आवेश खान, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांचाही १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताची वाढली चिंता, सराव सत्रात श्रेयस अय्यरला झाली दुखापत

पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india coach rahul dravid has says that kl rahul will not take wicket keeping in the test series against england vbm
First published on: 23-01-2024 at 17:41 IST