Team India Record In T20 World Cup Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत भारताला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचं स्वप्नभंग केलं होतं. पण याच मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. यासह जेतेपदाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. या सामन्यात भारतीय संघाने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ५ गडी बाद २५५ धावांचा डोंगर उभारला आहे. ही या स्पर्धेच्या इतिहासातील अंतिम सामन्यात कुठल्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघाने २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना ७ गडी बाद १७६ धावा केल्या होत्या. आता भारताने २५० हून अधिक धावा करून आपलाच रेकॉर्ड मोडून काढला आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारणारे संघ:
भारत – ५ गडी बाद २५५ धावा विरुद्ध न्यूझीलंड, अहमदाबाद, ८ मार्च २०२६
भारत – ७ गडी बाद १७६ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाउन, २९ जून २०२४
ऑस्ट्रेलिया – २ गडी बाद १७३ धावा विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, १४ नोव्हेंबर २०२१
न्यूझीलंड – ४ गडी बाद १७२ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई, १४ नोव्हेंबर २०२१
दक्षिण आफ्रिका – ८ गडी बाद १६९ धावा विरुद्ध भारत, ब्रिजटाउन, २९ जून २०२४
वेस्ट इंडिज – ६ गडी बाद १६१ धावा विरुद्ध इंग्लंड, ईडन गार्डन्स, ३ एप्रिल २०१६
भारत – ५ गडी बाद १५७ धावा विरुद्ध पाकिस्तान, जोहान्सबर्ग, २४ सप्टेंबर २००७
इंग्लंड – ९ गडी बाद १५५ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, ईडन गार्डन्स, ३ एप्रिल २०१६
पाकिस्तान – १० गडी बाद १५२ धावा विरुद्ध भारत, जोहान्सबर्ग, २४ सप्टेंबर २००७
