Women U19 WC: चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाने 'काला चष्मा' गाण्यावर केला डान्स; पाहा VIDEO Team India dancing video to song Kala Chashma after winning the ICC U19 Womens T20 World Cup went viral | Loksatta

Women U19 WC: चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाने ‘काला चष्मा’ गाण्यावर केला डान्स; पाहा VIDEO

Team India Dance Video: महिला अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. त्याचबरोबर विश्वचषकचा पहिला हंगाम जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. यानंतर टीम इंडियाने काला चष्मा गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Team India's Dance on Kala Chashma Song
टीम इंडिया (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महिला अंडर-१९ विश्वचषकचा पहिला हंगाम जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. या विश्वचषकचा अंतिम सामना भारत आणि इंग्ंलड संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजेतेपदाचा सामना जिंकला. ऐतिहासिक विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय अंडर-१९ महिला संघाने मैदानावर जल्लोष केला. त्याचबरोबर काला चष्मा या गाण्यावर डान्स केला. ज्याचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना विरोधी संघाला १७.१ षटकात ६८ धावांत सर्वबाद केले. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने १४ षटकांत ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. या इंग्लंडला पराभूत करून पहिल्यांदाच चॅम्पियन बनल्यामुळे टीम इंडियान शानदार जल्लोषही केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काला चष्मा गाण्यावर केला डान्स –

हेही वाचा – ICC U-19 Womens T20 WC: फायनल जिंकल्यानंतर कर्णधार शफाली वर्मा झाली भावूक, पाहा VIDEO

या विजयानंतर भारतीय महिला संघाची वेगळी शैली दिसून आली. विजयानंतर संघाचे खेळाडू ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसले. त्याचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. तितस दास साधूने ४ षटकांत ६ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय अर्चना देवीने २ आणि पार्श्वी चोप्राने २ बळी घेतले. त्याचवेळी सोमन यादव, मन्नत कश्यप आणि कर्णधार शफाली वर्मा यांनी १-१ विकेट घेतली. तीत साधूला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 10:04 IST
Next Story
ICC U-19 Womens T20 WC: फायनल जिंकल्यानंतर कर्णधार शफाली वर्मा झाली भावूक, पाहा VIDEO