scorecardresearch

‘WTC’ च्या फायनलमध्ये भारताची एन्ट्री! गूड न्यूज मिळताच विराटने मैदानातच केलं असं काही…Video झाला व्हायरल

विराट कोहलीचा अहमदाबादच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल का झाला? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Virat Kohli Viral Videos
विराट कोहलीचा अहमदाबादच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल. (Image-Instagram)

Viral Kohli Viral Video : अहमदाबाद कसोटी सामन्यात रंगतदार मोड पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४८० धावांची मजल मारली होती. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने कांगारुंना चोख प्रत्युत्तर देत दहा विकेट्स गमावत ५७१ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मैदानात उतरली आहे. मात्र, भारताचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादच्या कसोटी सामन्याची संपूर्ण क्रिडा विश्वात चर्चा रंगू लागली होती. कारण वर्ल्ड टेस्च चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश मिळण्यासाठी भारताला बॉर्डर गावसकर टॉफ्रीतील हा अखेरचा सामना जिंकण अनिवार्य होतं. पण आता टीम इंडियाला सामना पूर्ण होण्याआधीच एक आनंदाची बातमी मिळालीय.

कारण श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा २ गडी राखून पराभव केला. या सामन्यावर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचं गणित अवलंबून होतं. त्यामुळे आता भारताने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताला ही गूड न्यूज मिळताच सर्व खेळाडूंना विलक्षण आनंद झाला अन् विराट कोहलीच्या आनंदाला पारावर उरला नाहीय. कारण विराटने मैदानात केलेली एक कृती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

नक्की वाचा – WPL 2023 : चेंडू स्टंपला लागला तरीही हरमनप्रीतला दिलं नॉटऑऊट! सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामना अतितटीचा झाला. कारण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडने हा सामना फक्त २ विकेट्स राखून जिंकला. अखेरच्या षटकात चौकार ठोकणारा केन विल्यमसन या सामन्याचा शिल्पकार ठरला. दुसरीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. पण त्याआधीच भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच विराट कोहलीचा अहमदाबादच्या मैदानातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अहमदाबादच्या मैदानात आनंद व्यक्त केला. त्यावेळी विराट कोहली सर्व खेळाडूंना हात मिळवत असल्याचं या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानात ७ जून ते ११ जून या कालावधीत खेळवला जाणार आहे. भारताने याआधीही डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण न्यूझीलंडने त्यावेळी भारताचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:10 IST