scorecardresearch

Premium

World Cup 2023: १२ वर्षांनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा उचलणार वर्ल्डकप ट्रॉफी, ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती

ICC World Cup 2023: १९८७च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने बॉल बॉयची भूमिका केली होती. १९९२ ते २०११ पर्यंत सचिन भारताकडून सलग ६ विश्वचषक खेळला. आता २०२३च्या विश्वचषकापूर्वी आयसीसीने सचिनची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

God of cricket Sachin Tendulkar will add glory to World Cup 2023 ICC made global ambassador
२०२३च्या विश्वचषकापूर्वी आयसीसीने सचिनची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. सौजन्य- (ट्वीटर)

ICC World Cup 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी क्रिकेटचा देव आणि भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरची अहमदाबाद येथे ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी म्हणून नियुक्ती केली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय विश्वचषकात सहा वेळा सहभाग घेतला आहे. सचिन पहिल्यांदा १९९२ मध्ये विश्वचषक खेळला होता. तो शेवटचा २०११च्या विश्वचषकात दिसला होता, जेव्हा भारतीय संघाने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले होते.

सचिन विश्वचषक सुरू झाल्याची घोषणा करेल

गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर विश्वचषक ट्रॉफीसह मैदानात उतरेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करेल. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “१९८७ मध्ये बॉल बॉय बनण्यापासून ते सहा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत विश्वचषकाचे माझ्या हृदयात नेहमीच विशेष स्थान राहिले आहे. २०११ मध्ये विश्वचषक जिंकणे हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अभिमानास्पद क्षण होता.

He did not get as much credit as he should have Ashwin expressed his pain regarding the world champion player Gautam Gambhir
World Cup 2023: वर्ल्डकप २०२३पूर्वी आर. अश्विनचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “गंभीरला जेवढे श्रेय हवे होते…”
ICC ODI World Cup 2023 Updates
World Cup 2023: विराट कोहलीने वर्ल्डकप पूर्वी मित्र-मंडळीना केली विनंती; म्हणाला, “आम्ही विश्वचषकाकडे वाटचाल करतोय पण…”
India squad announced for ODI series against Australia
IND vs AUS: सहा वर्षांत दोन वनडे खेळणारा अश्विन २१ महिन्यांनंतर परतला, काय आहे रोहित-आगरकरचा प्लॅन?
IND VS AUS
IND VS AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, केएल राहुलकडे नेतृत्व, तीन खेळाडूंचं पुनरागमन

हेही वाचा: Asian Games 2023: शेतकऱ्याच्या लेकीनं चीन मध्ये फडकवला तिरंगा, पारुलने दोन दिवसांत दोन पदकं जिंकत लिहिला ‘सुवर्ण’ इतिहास

युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल- सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर म्हणतो की विश्वचषकासारख्या स्पर्धा युवा खेळाडूंना खूप प्रेरणा देतील. तो म्हणाला, “भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत अनेक मातब्बर संघ आणि खेळाडू जोरदार मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. मी या अप्रतिम स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा युवा खेळाडूंना प्रेरणा देतात. मला आशा आहे की, यावेळी ही स्पर्धा तरुण मुला-मुलींना खेळात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना भारताचे मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित करेल.”

हेही वाचा: Asian Games 2023: बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर, कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू

विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज

सचिन तेंडुलकरने वयाच्या १९व्या वर्षी पहिला विश्वचषक खेळला होता. जेव्हा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. विश्वचषक स्पर्धेत २००० हून अधिक धावा करणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे. एकाच विश्वचषकात सर्वाधिक ६६३ धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे.

माहितीसाठी की, वर्ल्ड कपचा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच्या एक दिवस आधी विश्वचषकाचा उद्घाटन सोहळाही आयोजित केला जाणार आहे. कॅप्टन डे आणि हा सोहळा या स्टेडियममध्ये ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या समारंभात सर्व संघांचे कर्णधारही सहभागी होणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Team india god of cricket sachin tendulkar becomes global ambassador of icc world cup avw

First published on: 03-10-2023 at 23:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×