जागतिक हॉकी लीगसाठी मध्यरक्षक सरदार सिंगकडेच भारताच्या पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा रायपूर येथे १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
भारताच्या संभाव्य संघाचे बंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सराव शिबीर सुरू आहे. या शिबिरातील कामगिरीच्या आधारे
१८ खेळाडूंच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. लीगपूर्वी भारत ऑस्ट्रेलियाबरोबर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने राजनंदगाव व रायपूर येथे होणार आहेत.

भारतीय संघ
गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योत सिंग.
बचावरक्षक : बिरेंद्र लाक्रा, कोठाजित सिंग, व्ही. आर. रघुनाथ, जसजित सिंग, रूपिंदरपाल सिंग.
मध्यरक्षक : सरदार सिंग (कर्णधार), चिंगलेनासाना सिंग, देविंदर वाल्मीकी, मनप्रीत सिंग, धरमवीर सिंग, दानिश मुजताबा.
आघाडी फळी : एस. व्ही. सुनील, रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, ललित उपाध्याय, तलवार सिंग.