WTC 2023 Final India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांची इनिंग घोषीत केलीय. ऑस्ट्रेलियाने ८४.३ षटकांमध्ये ८ विकेट्स गमावात २७० धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४३ धावांची आघाडी घेतली असून भारताल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी ४४४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार आहे. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली होती. शुबमन गिल १८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने कमान सांभाळली होती.

मात्र, नेथन लायनने कर्णधार रोहित शर्माला ४३ धावांवर आणि पॅट कमिन्सने चेतेश्वर पुजाराला २७ धावांवर बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. पण त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं अप्रतिम फलंदाजी करून भागिदारी केली. विराट कोहली ६० चेंडूत ४४ तर अजिंक्य रहाणे ५९ चेंडूत २० धावांवर नाबाद राहिला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून ४० षटकांमध्ये भारताने ३ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी भारताला अजूनही २८० धावांची आवश्यकता आहे. उद्या रविवारी शेवटचा दिवस असून भारत ९० षटकांमध्ये २८० धावा करून ४४४ धावांचं लक्ष्य गाठतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IPL 2024 : चेन्नईसाठी आनंदाची बातमी, पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला बोर्डाकडून मिळाली सुट्टी
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य

शुबमन गिलची विकेट संशयास्पद

भारताचे सलामीवर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल कांगांरुंचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरले आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर शुबमन १८ धावांवर खेळत असताना त्याने स्लिपमध्ये चेंडू मारला आणि कॅमरून ग्रीनने झेल पकडला. मात्र, झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं. तसंच आधुनिक तंत्रज्ञान असतानाही थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम आणि फ्रिझ केला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांसह समालोचकांनी नाराजी व्यक्त केली. गिलला अंपायरने बाद दिल्यानंतर रोहित शर्माने अंपायरशी चर्चा केली. पंरतु, त्यानंतरही गिलला बाद देण्यात आलं आण टीम इंडियाला पहिला धक्का बसला.