IND vs AUS, Playing 11 Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील ४ सामने झाल्यानंतर भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना आज गाबाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. जर सामना गमावला तरीदेखील मालिका २-२ ने बरोबरीत सुटणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघांच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. कोणत्या ११ खेळाडूंना स्थान मिळू शकते? जाणून घ्या.
संजू सॅमसनला संधी मिळणार ?
यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. यष्टिरक्षक जितेश शर्मा किंवा मग तिलक वर्माला विश्रांती देऊन हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला या मालिकेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. यासह आणखी काही मोठे बदल केले जाऊ शकतात. नितीश कुमार रेड्डी किंवा रिंकू सिंग यांनाही प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. असं झाल्यास शिवम दुबे किंवा मग वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती दिली जाऊ शकते.
फलंदाजीसह गोलंदाजीतही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. अनुभवी खेळाडू जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी हर्षित राणाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. हर्षित राणाला मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले गेले होते. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हर्षितला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ३५ धावांची खेळी केली होती. पण गोलंदाजीत तो फार चांगली कामगिरी करू शकला नव्हता.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा/रिंकू सिंग, जितेश शर्मा/संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे/नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा.
