Team India Playing XI For IND vs SL 1st Test: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉलच्या मैदानावर खेळवला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सराव सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शनसारखे स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळताना दिसून येणार नाहीत. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये कोणाला संधी द्यायची असा प्रश्न कर्णधार शुबमन गिलसमोर असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची संभावित प्लेईंग ११? जाणून घ्या.

श्रीलंकेत फिरकी गोलंदाजांना चांगलीच मदत मिळते. त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये अष्टपैलू आणि नवख्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. या सामन्यात सारांश जैनला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. तर मानव सुथार आणि रवींद्र जडेजा हे तिन्ही फिरकी गोलंदाज प्लेईंग ११ चा भाग असू शकतात.

यासह वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांना संधी दिली जाऊ शकते. सारांश जैन, रवींद्र जडेजा आणि मानव सुथार या फिरकी गोलंदाजांना साथ देण्यासाठी अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा देखील प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून भारतासमोर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल असे २ पर्याय आहेत. ऋषभ पंत सराव सामन्यात हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. पण अनुभव पाहता, त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. तर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल. साई सुदर्शनच्या जागी देवदत्त पडिक्कलला संधी दिली जाऊ शकते. तर कर्णधार शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.\

पहिल्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११:

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मानव सुथार,कुलदीप यादव, सारांश जैन,प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज