India vs USA, Team India Playing XI Prediction: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाणार आहेत. तर पहिल्या दिवशी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना स्कॉटलँडविरूद्ध होणार आहे. तर स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.

भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. टी-२० वर्ल्डकपआधी न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. ही मालिका भारतीय संघाने ४-१ ने आपल्या नावावर केली होती. या मालिकेतील एका सामन्यात भारतीय संघाने प्लेईंग ११ मध्ये बदल करून पाहिले होते, त्यामुळे हा सामना गमवावा लागला होता. त्यानंतर गुरूवारी झालेल्या सराव भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली.

बीसीसीआयने या स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या भारतीय संघातील २ खेळाडू सध्या पूर्णपणे फिट नाहीत. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. तर या सामन्याआधी आणखी एक टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे बाहेर झाल्याची माहिती समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्याच्याजागी मोहम्मद सिराजला त्याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

अमेरिकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा डावाची सुरूवात करणार, हे निश्चित आहे. पण दुसरा सलामीवीर फलंदाज कोण असेल? हे अजूनही कळू शकलेलं नाही. सराव सामन्यात इशान किशनने डावाची सुरूवात केली होती. डावाची सुरूवात करताना त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. यावरून संजू सॅमसनची सुट्टी झाल्याचं चित्र आहे. संघातील डावखु्ऱ्या हाताचा स्फोटक फलंदाज तिलक वर्माचं पुनरागमन झालं आहे. तो या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. तर कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर शिवम दुबे, हार्दिक पांड्या किंवा अक्षर पटेलपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. स्फोटक फलंदाज रिंकू सिंग फिनिशरची भूमिका पार पाडताना दिसेल.

फलंदाजीक्रमात बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. तर गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरूण चक्रवर्ती यांना संधी मिळणार, हे देखील जवळजवळ निश्चित आहे. तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शिवम हे खेळाडू देखील गोलंदाजीत योगदान देताना दिसून येतील. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात अभिषेक शर्माने गोलंदाजी करून विकेट्सही घेतल्या होत्या.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती,