Team India Playing 11 Prediction: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्ड २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली. पण सुपर ८ फेरीत भारतीय संघाला हवी तसी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेत संघातील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा, अभिषेक शर्मा फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे संजू सॅमसनला खेळवण्याची मागणी वाढू लागली आहे.
भारतीय संघातील टॉप ३ फलंदाजांमध्ये डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे या फलंदाजांविरूद्ध गोलंदाजी करण्यासाठी ऑफ स्पिनरला गोलंदाजी आक्रमणाला लावलं जात आहे. ऑफ स्पिनरचा सामना करताना भारतीय फलंदाज अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मासोबत डावाची सुरूवात करण्यासाठी संजूला स्थान देण्याची मागणी केली जात आहे. तर आऊट ऑफ फॉर्म तिलक वर्माला संघाबाहेर करण्याची मागणी केली जात आहे. त्याच्या जागी इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची मागणी केली जात आहे.
प्लेईंग ११ बाबत बोलताना इरफान पठाण काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवानंतर स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात बोलताना इरफान पठाण म्हणाला,अभिषेक शर्माला बाहेर करण्याचा विचार केला जाऊ शकत नाही. पण तिलक वर्माच्या स्थानाबाबत नक्कीच विचार केला जाऊ शकतो. तिलकच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. सुरूवातीलाच डावखुऱ्या हाताचे फलंदाज असणं, हे विरोधी संघातील खेळाडूंसाठी प्लॅनिंग करण्याचं काम आणखी सोपं करत आहे.
तसेच भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा अक्षर पटेलला संघाबाहेर करण्याच्या निर्णयावर नाराज आहे. आकाश चोप्रा म्हणाला की, “अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. असं असताना अक्षरला बाहेर करून सुंदरला संघात स्थान देणं, हा निर्णय मला योग्य वाटला नाही.
झिम्बाब्वेविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेईंग ११:
अभिषेक शर्मा,संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रिंकू सिंग, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
