Team India Predicted Playing 11 For India vs West Indies 5th T20I: या संपूर्ण मालिकेत फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पण भारतीय गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान फलंदाजी करताना अर्शदीपच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो पाचव्या टी-२० सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मालिकेतील शेवटच्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का?

मालिकेतील पहिल्या सामन्यापासून सर्वांना एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? तर मालिकेतील शेवटच्या सामन्यातही वैभवला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. गेल्या सामन्यात फलंदाजी करताना संजू सॅमसनने वादळी सुरूवात करून दिली होती. तर अभिषेक शर्मा देखील तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा बाकावरच बसून राहावं लागेल.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

आतापर्यंत ज्या ४ मैदांनावर सामने झाले आहेत. त्या मैदानांवर फलंदाजांचीच चांदी झाली आहे. आता पाचव्या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. कारण हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर आतापर्यंत अनेक हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. मैदान छोटं असल्याने इथे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातो.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेईंग ११

भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मयंक यादव, प्रिन्स यादव.

वेस्ट इंडिज संघ: शे होप (कर्णधार व यष्टिरक्षक), ज्वेल अँड्र्यू, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रदरफोर्ड, रोमारिओ शेफर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, शामर स्प्रिंगर, गुडाकेश मोती, शमार जोसेफ