India vs New Zealand Test Squad: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये टी- २० मालिकेचा थरार सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ आधी टी-२०, वनडे आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. काही दिवसांपूर्वी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. आता बीसीसीआयकडून वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात काही खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना वगळण्यात आलं आहे.

मानव सुथार बाहेर, शमीला पुन्हा संधी नाहीच

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठी मानव सुथारला संघात स्थान देण्यात आलं होतं. या २४ वर्षीय गोलंदाजाने गॉल कसोटीतील दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले होते. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले होते. पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला डच्चू देण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मोहम्मद शमीलाही पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. त्याने रणजी ट्रॉफीतही चांगली गोलंदाजी केली आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आलेली नाही.

भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आणि मोहम्मद सिराज

भारत-न्यूझीलंड सुरुवातीच्या ३ वनडे सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा (फिटनेसवर अवलंबून) आणि कुलदीप यादव.

चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.