Team India Squad For IND vs AFG Series: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे ३ संघ ठरले आहेत. तर १ स्थानासाठी ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ रोजी खेळवला जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ वनडे आणि कसोटी मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. ६ जूनपासून दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघातील बहुतांश खेळाडू हे गुजरात टायटन्स संघातील आहेत.
अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १५ पैकी ७ खेळाडू हे गुजरात टायटन्स संघाचे आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. यासह साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर , प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, मानव सुथार आणि गुरनुर ब्रार यांचा समावेश आहे.
यासह वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात देखील गुजरात टायटन्स संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या संघात गुजरातच्या ४ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. शुबमन गिल हा वनडे संघाचा देखील कर्णधार आहे. यासह प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि गुरनुर ब्रार या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा कसोटी सामना ६ जूनपासून सुरू होणार आहे. हा सामना न्यू चंदिगडमध्ये खेळवला जाणार आहे. तर वनडे मालिकेतील सामने १४,१७ आणि २० जून रोजी खेळवले जाणार आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार) साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
