scorecardresearch

T20 WC : टीम इंडियाच्या सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहायचे सामने

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी भारत ‘या’ संघांविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.

T20 WC : टीम इंडियाच्या सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहायचे सामने
भारताच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळली जाईल. टीम इंडिया विश्वचषक विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे आणि २४ ऑक्टोबर रोजी स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे.

टीम इंडियाच्या टी-२० वर्ल्डकपमधील सराव सामन्यांचे वेळापत्रक

  • १८ ऑक्टोबर, भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला सराव सामना
  • २० ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा सराव सामना

सराव सामने कधी, कुठे आणि कसे पाहायचे?

टीम इंडियाचे सराव सामने कुठे खेळले जातील?

भारतीय क्रिकेट संघाचे दोन्ही सराव सामने दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील.

टीम इंडियाचे सराव सामने कोणत्या वेळी सुरू होतील?

टीम इंडियाचा पहिला सराव सामना सायंकाळी साडेसात वाजता, तर दुसरा सराव सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.

कोणत्या चॅनेलवर टीम इंडियाचे सराव सामने पाहता येतील?

टीम इंडियाचे सराव सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील.

हेही वाचा – ऐकलंत का..! ‘दिग्गज’ क्रिकेटपटूनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली!

टीम इंडियाच्या सराव सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग मी ऑनलाइन कुठे पाहू शकतो?

तुम्ही भारतीय संघाच्या सराव सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 16:22 IST

संबंधित बातम्या