Team India Warm Up Match Schedule: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सराव सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय अ संघाचा सराव सामना अमेरिकेविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय अ संघाने दमदार विजयाची नोंद केली. दरम्यान भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिला सराव सामना केव्हा, कधी आणि कुठे खेळवला जाईल? जाणून घ्या.
भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नुकताच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत ४-१ ने विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा चांगलाच सराव झाला आहे. भारतीय संघ अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात करणार आहे. भारतीय खेळाडूंनी मुंबईत सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान भारतीय संघाचा पहिला सराव सामना ४ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ ४ फेब्रुवारीला आपला पहिला सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी. वाय.पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघ आपले सामने संध्याकाळच्या वेळी खेळणार आहे. हा सामना तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. त्यामुळे हा सामना देखील संध्याकाळच्या वेळी खेळवला जाणार आहे. नवी मुंबईत धावांचा पाऊस पाडला जातो. काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेतही धावांचा पाऊस पाडला गेला होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सराव सामन्यात सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीवर असणार आहे. ते म्हणजे, भारतीय संघाची सलामी जोडी कशी असणार? आधी अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन सलामीला येणार हे जवळजवळ निश्चित होतं. पण न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत संजू सॅमसन पूर्णपणे फ्लॉप राहिला. तर यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने दमदार शतकी खेळी केली. त्यामुळे इशान किशन की संजू सॅमसन? असा प्रश्न सूर्यकुमार यादवसमोर असणार आहे. जर इशान किशन सलामीला आला तर संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

