scorecardresearch

Team India: रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण होणार? ‘हा’ खेळाडू आहे सर्वात मोठा दावेदार

टी२० विश्वचषक-२०२२ नंतर, काही क्रिकेट तज्ञांनी रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, परंतु तो आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही टीम इंडियाचे नेतृत्व करेन. दरम्यान, त्याच्या वारसदाराचीही चर्चा सुरू झाली आहे.

Team India: रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण होणार? ‘हा’ खेळाडू आहे सर्वात मोठा दावेदार
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

भारताचा धडाकेबाज फलंदाज सलामीवीर रोहित शर्मा टीम इंडियाचे कर्णधारपद चोखपणे सांभाळत आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. काही क्रिकेट तज्ज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते परंतु असे मानले जात आहे की आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातही रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करेल. दरम्यान, त्यांच्या वारसदाराचीही चर्चा सुरू झाली आहे.

रोहितनंतर पुढचा कर्णधार कोण?

आयपीएलमध्ये केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक नायरने रोहितनंतर पुढच्या कर्णधारावर आपलं मत मांडलं आहे. या माजी अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, श्रेयस अय्यर हा आगामी काळात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी चांगला उमेदवार आहे. रोहित नुकताच ३५ वर्षांचा झाला आहे. हार्दिक पांड्याला टी२० संघाचे कायमचे कर्णधारपद मिळू शकते. इतर फॉरमॅटमध्ये फक्त रोहितच कमांड हाताळत आहे.

हेही वाचा: Ind vs Sri: ‘जेव्हा फिल्डिंग कोच शानदार झेलसाठी इशान किशनची पाठ थोपटतात तेव्हा…’ बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

श्रेयसची स्तुती करा

श्रेयस अय्यर सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या माध्यमातून त्याने नेतृत्व अनुभव मिळवला आहे. श्रेयसने २०१८ च्या मध्यात गौतम गंभीरकडून दिल्ली कॅपिटल्स (DC) चे कर्णधारपद स्वीकारले आणि २०२० मध्ये त्यांच्या पहिल्या आयपीएल फायनलमध्ये फ्रँचायझीचे नेतृत्व केले. अभिषेकने टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, श्रेयस हा नैसर्गिक नेता आहे, जो खेळाडूंना मैदानावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देतो.

नायर म्हणाला, “श्रेयस हा अतिशय नैसर्गिक नेता आहे. आम्ही त्याला आयपीएलमध्ये संघांचे नेतृत्व करताना पाहिले आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि आता कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले. तरुण वयात कर्णधारपद भूषवण्यास सक्षम अशी व्यक्ती आहे. तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे. ही गोष्ट त्यांना खास बनवते. तो असा कर्णधार आहे जो सहकारी खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो. तो खेळाबद्दल विचार करतो, विश्लेषण करतो आणि फक्त स्वतःवर काम करत नाही. तसेच त्याच्या सहकाऱ्यांना चांगले होण्यास मदत करतो.”

हेही वाचा: Ind vs Sri live telecast: अबब! स्टार स्पोर्ट्स+हॉटस्टारला भारत श्रीलंकेच्या मालिका प्रक्षेपणामध्ये तब्बल २०० करोडचे नुकसान

श्रेयसची आतापर्यंतची कारकीर्द

श्रेयसने २०१८-१९ विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व केले. श्रेयस अय्यरने आतापर्यंत ७ कसोटी, ३९ एकदिवसीय आणि ४९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत एक शतक आणि ५ अर्धशतकांसह ६२४ धावा केल्या आहेत, एकदिवसीय सामन्यात २ शतके आणि १४ अर्धशतकांसह १५३७ धावा केल्या आहेत, तर टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ७ अर्धशतकांसह १०४३ धावा केल्या आहेत. त्याच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीत त्याने १३ शतकांसह एकूण ५३२४ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 20:44 IST

संबंधित बातम्या