Rajeev Shukla On Asian Games Hotel Controversy: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला येत्या १३ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ही मालिका आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने सराव मालिका असणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. पण भारतीय संघ कुठल्या हॉटेलमध्ये थांबणार यावरून बरीच चर्चा रंगली. ज्या हॉटेलमध्ये खेळाडूंची राहण्याची सोय करण्यात आली आहे, त्यावरून बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आयोजकांनी बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलं होतं की, तुम्ही तुमची सोय करून घ्या. आता स्पर्धा तोंडावर असताना बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
आयोजकांकडून खेळाडूंसाठी ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती, त्या हॉटेलचे रूम इतके छोट आहेत की किटबॅगही व्यवस्थित ठेवता येणार नाही, अशी तक्रार बीसीसीआयने केली होती. त्यानंतर भारतीय खेळाडू फाय स्टार हॉटेलमध्ये राहणार असल्याची चर्चा रंगली होती. पण आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आयोजकांनी ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे, भारतीय खेळाडू तिथेच थांबणार.
राजीव शुक्ला यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आयोजकांकडून जिथे राहण्याची सोय करण्यात आली आहे, भारतीय खेळाडू तिथेच थांबणार आहेत. खेळाडूंना कुठे राहणार, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कारण त्यांना कुठलाही त्रास व्हायला नको. हे फाय स्टार हॉटेल नाही, पण उत्तम हॉटेल आहे. खेळाडू तिथे गेल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, त्या हॉटेलचे फोटो आणि व्हिडीओ आम्ही मागवून घेतले आहेत. खेळाडू त्याच हॉटेलमध्ये थांबणार आहेत. जर इथे थांबण्यास नकार दिला असता, तर दुसरा प्लॅन ओसाका किंवा टोकियोमध्ये थांबण्याचा होता. पण हे सामन्याच्या ठिकाणापासून खूप दूर आहे.
भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केव्हा रवाना होणार?
आशियाई क्रीडा स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. भारतीय संघ २० सप्टेंबरला टोकियोला जाण्यासाठी रवाना होणार आहे. भारतीय संघ २२ सप्टेंबरला जपानसोबत मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. तर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिला सामना २८ सप्टेंबरला खेळणार आहे. हा या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. आधी एका रुममध्ये २ खेळाडू राहणार असं ठरलं होतं. पण बीसीसीआयला एका रूममध्ये एकच खेळाडू हवा आहे.
