India Creates World Record with 60 Balls Victory: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील गुवाहाटीमधील टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. सुरूवातीला भारताच्या गोलंदाजांनी त्यानंतर टॉप फलंदाजी फळीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत विजय मिळवला. टीम इंडियाने ८ विकेट्सने तिसरा सामना जिंकत मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी मिळवली. यासह टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.
भारतीय संघाने न्यूझीलंडने दिलेलं १५४ धावांचं लक्ष्य अवघ्या १० षटकांत गाठलं. यासह भारताने ६० चेंडू शिल्लक ठेवत टी-२०मधील सर्वात मोठा विजय नोंदवला. भारतीय संघाने मालिकेत ३-० अशी आघाडी मिळवत मालिकादेखील आपल्या नावे केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग १०वी टी-२० मालिका जिंकली आहे.
भारतीय संघाने घरच्या मैदानावर सलग १०वी टी२० मालिका जिंकली आहे. या बाबतीत, भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने घरच्या मैदानावर सलग आठ टी-२० मालिका जिंकल्या आहेत.
घरच्या मैदानावर सर्वाधिक सलग मालिका विजय (पूर्ण वेळ सदस्य संघ)
१० मालिका विजय – भारत (२०२२-२६) *
८ मालिका विजय – ऑस्ट्रेलिया (२००६-१०)
७ मालिका विजय – भारत (२०१९-२२)
५ मालिका विजय – पाकिस्तान (२००८-१८)
भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाने १५४ धावांचे लक्ष्य फक्त ६० चेंडूत पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पूर्णवेळ खेळणाऱ्या देशाविरुद्ध पूर्णवेळ खेळणाऱ्या देशाने केलेला १५० पेक्षा जास्त धावांचा हा सर्वात जलद पाठलाग आहे. भारतीय संघ हा सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत एखाद्या संघाविरूद्ध विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. अवघ्या १० षटकांत १५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठणारा भारतीय संघ पहिला पूर्ण सदस्य देश बनला.
सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत १५० अधिक धावांचं लक्ष्य गाठणारे संघ (पूर्ण सदस्य संघ)
६० चेंडू: भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, २०२६
३७ चेंडू: वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, किंग्स्टन, २०२४
३३ चेंडू: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, २०२२
३२ चेंडू: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, जोहान्सबर्ग, २०१६
सर्वाधिक सलग टी२० मालिका विजय मिळवणारे संघ (पूर्ण सदस्य संघ)
११* – भारत (२०२४ – सध्या)
११ – पाकिस्तान (२०१६-१८)
७ – भारत (२०१७-१८)
६ – भारत (२०१९-२१)
