scorecardresearch

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी उमरान संघात आवश्यक -वेंगसरकर

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिक भारतीय संघात आवश्यक आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

sp vengaskar

मुंबई : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज उमरान मलिक भारतीय संघात आवश्यक आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

मुंबईत ‘पेमेंट्झ’ आणि १९८३ मधील विश्वविजेता भारतीय संघ यांच्यातर्फे ‘दी १९८३ वल्र्डकप ओपस’ या चित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी कर्णधार कपिल देव, मोहिंदूर अमरनाथ, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, सय्यद किरमाणी, मदनलाल, संदीप पाटील, बलिवदर संधू, कृष्णमाचारी श्रीकांत, सुनील वॉल्सन, दिलीप वेंगसरकर, पी.आर. मान सिंग यांच्यासह विश्वविजेते सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी वेंगसरकर म्हणाले, ‘‘उमरानमधील गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. ‘आयपीएल’मध्येही छाप पाडत ट्वेन्टी-२० प्रकारात सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी तो संघात हवा. या संधीचे उमरान सोने करेल, अशी मला खात्री आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Team twenty20 world cup vengsarkar fast bowler umran malik ysh