Temba Bavuma Breaks Rohit Sharma Record: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजयाची नोंद केली. यासह मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तेंबा बावूमा हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळेस हरवण्याच्या रेकॉर्डमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. तेंबा बावूमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील ३ पैकी २ सामने आपल्या नावावर केले आहेत.

तेंबा बावूमाने मोडला रोहित शर्माचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमा हा पॅट कमिन्सविरोधात खेळताना नेतृत्वाच्या बाबतीत नेहमीच भारी पडला आहे. रोहित शर्माने पॅट कमिन्सविरुध्द खेळताना भारतीय संघाला २ सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला होता. आता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने हा पराक्रम ३ वेळा करून दाखवला आहे. या रेकॉर्डमध्ये तो आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दमदार विजय

केप टाऊनमध्ये पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी २८८ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना कगिसो रबाडा आणि सायमन हार्मरच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. सायमन हार्मरने या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर रबाडाने ३ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना अवघ्या ४२ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. कॅमरून ग्रीनने २७ तर ट्रॅव्हिस हेडने १४ धावा केल्या. यादरम्यान ४ फलंदाज तर शून्यावर बाद होऊन माघारी परतले. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या १११ धावांवर आटोपला.

या पराभवाचा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ७५ वरून घसरली असून ६९.२३ वर जाऊन पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर सामना जिंकूनही दक्षिण आफ्रिकेला टक्केवारीत मोठी झेप घेता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेची विजयाची सरासरी ६६.६७ वरून ७१.४२ वर जाऊन पोहोचली आहे. तर न्यूझीलंडचा संघ ७२.२२ टक्केवारीसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ ५१.५२ विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानी आहे.