ज्ञानेश भुरे, लोकसत्ता

पुणे : करोना लसविरोधक नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. ही जोकोव्हिचची वैयक्तिक भूमिका आहे. पण तरी कमालीच्या लयीत असणाऱ्या या तारांकित टेनिसपटूची उणीव निश्चितपणे भासेल, असे मत भारताचे माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केली.

Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
British Prime Minister Rishi Sunak batting in the net session with England players
Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा केला सामना, VIDEO होतोय व्हायरल
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Will Ruturaj Gaikwad become the captain of Chennai Super King like Mahendra Singh Dhoni
महेंद्रसिंह धोनीने उत्तराधिकारी म्हणून ऋतुराज गायकवाडलाच का निवडले?

‘‘करोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण आता आवश्यक आहे. प्रत्येक देशांच्या याबाबत काही अटी आणि शर्थी आहेत. अमेरिकेने लस अनिवार्य केली आहे. त्याच वेळी जोकोव्हिच लसीकरणाच्या विरोधात ठाम उभा आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आपण यात हस्तक्षेप करू शकत नाही. पण, एक नक्की जोकोव्हिच सातत्याने उत्तम खेळत होता. विम्बल्डनमध्ये याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे नदालला विजेतेपदाची अधिक संधी असली, तरी जोकोव्हिचची उणीव जाणवणार यात शंका नाही,’’ असे अमृतराजने सांगितले.

स्पर्धेतील आव्हानाविषयी अमृतराज म्हणाला, ‘‘यंदाच्या स्पर्धेत अनेक नवे चेहरे दिसणार असले, तरी जोकोव्हिच नसल्याचा फरक पडणार आहे. नदालसाठी कार्यक्रमपत्रिका सोपी असली, तरी त्याच्या वाटचालीबाबत खात्रीने भाष्य करता येणार नाही. एक तर तो पूर्ण तंदुरुस्त नाही आणि हार्ड कोर्टवर त्याचा तेवढा प्रभाव जाणवत नाही. पहिल्या आठवडय़ात त्याला किती सेटपर्यंत खेळावे लागते आणि दुसऱ्या आठवडय़ात तो कितपत टिकतो, यावर बरेच काही अवलंबून असेल. डॅनिल मेदवेदेव, स्टेफानोस त्सित्सिपास, कार्लोस अल्कारेझ अशा दुसऱ्या फळीला गुणवत्ता दाखवून देण्याची चांगली संधी आहे.’’

‘‘महिला एकेरीत सध्या इगा श्वीऑनटेकचे नाव प्राधान्याने समोर येत असले, जेतेपदासाठी कमालीची झुंज रंगेल. अनेक महिला नव्याने चमकत आहेत. विविध स्पर्धेत १७व्या, १८व्या स्थानावरील खेळाडू जिंकत आहेत. यावेळीदेखील महिला विभागात चुरस बघायला मिळेल,’’ असेही अमृतराज म्हणाले.

‘‘भारतीय खेळाडूंना ग्रँडस्लॅम स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा एकही भारतीय मुख्य फेरीत नाही. पण, आगामी पाच वर्षांत नव्या फळीकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल,’’ असे मत अमृतराज यांनी मांडले.

क्रीडा विश्वात काही खेळाडूंची आपली वेगळी छाप असते. फॉम्र्युला-वन शर्यतींमध्ये मायकल शूमाकर, अ‍ॅथलेटिक्समध्ये कार्ल लुईस यांचा ठसा कसा पुसता येणार नाही. तसाच व्हिनस आणि सेरेना विल्यम्सचा टेनिसमधील ठसा विसरता येणार नाही. त्यांनी कमालीचे वर्चस्व राखले आहे.

– विजय अमृतराज