scorecardresearch

Shubman Gill: ‘तेरा ध्यान किधर है…’, शुबमन गिलने ‘या’ मुलीसाठी केले डेटिंग अ‍ॅप जॉईन! चाहते म्हणाले, “साराला विसरलात का?”

Shubman Gill: भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुबमन गिल आजकाल आपल्या चमकदार कामगिरीने अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडत असून संघातील आपला दर्जा वाढवत आहे.

Shubman Gill accepts Tinder girl's proposal Fans said what will happen to Sara? watch video
सौजन्य- (ट्विटर)

भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुबमन गिल आजकाल आपल्या चमकदार कामगिरीने अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडत असून संघातील आपला दर्जा वाढवत आहे. फील्डशिवाय तो नेहमीच त्याच्या लूक आणि अफेअर्समुळे चर्चेत असतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला, या सामन्यात त्याने पहिले टी२० शतक झळकावले. त्याचवेळी या सामन्यात शतकवीर शुबमन गिलचा एका चाहत्या मुलीच्या पोस्टरसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यावर शुबमन गिलसोबत ‘टिंडरवर मैच मेकिंग कर’ असे लिहिले होते. यानंतर चाहत्यांसह अनेक खेळाडूंनी गिलला सोशल मीडियावरील पोस्ट पाहण्यास सांगितले, ज्यावर गिलने आता प्रतिक्रिया दिली आहे.

किवी संघाविरुद्धच्या टी२० सामन्यात गिलने ६३ चेंडूत १२६ धावांची तुफानी इनिंग खेळली होती, त्यावेळी एका चाहत्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती मुलगी हातात पोस्टर धरून होती. आणि त्यावर लिहिले होते., ‘टिंडर, शुबमन से मैच करा दो…’ फॅन मुलीचा हा अनोखा प्रस्ताव सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर उमेश यादवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुबमनला आवाहन केले आणि लिहिले की, ‘आता संपूर्ण नागपूर बोलत आहे. आता बघ..’

शुबमन गिल मुलीसाठी टिंडरवर आला, लिहिले – आता तुम्ही बघा

प्रत्यक्षात अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात तरुणीने पकडलेल्या पोस्टरनंतर शुबमन गिलच्या सर्वत्र चर्चा सुरू झाल्या, टिंडर अ‍ॅपनेही याचा फायदा घेत सर्वप्रथम नागपुरात सर्वत्र पोस्टर लावले. अ‍ॅपद्वारे पोस्टरच्या एका बाजूला मुलीचे पोस्टर चित्र जोडलेले आहे. दुसऱ्या बाजूला लिहिले आहे, ‘शुबमन एकदा इकडे तर बघ.” अखेर शुबमन गिलने यावर प्रतिक्रिया दिली असून इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि लिहिले आहे की, “मी तर तुम्हाला पाहिले आहे, आता तुम्हीही बघा” खर तर हे टिंडरचे पेड प्रमोशन आहे.

शुबमनच्या पोस्टवर चाहत्यांचे प्रश्न

शुबमन गिलने इंस्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो हावभावांमधून सर्वकाही समजावून सांगत आहे. कॅप्शनमध्ये गिलने लिहिले आहे की, “मैने तो देख लिया, अब तुम देख लो” एवढेच नाही तर गिलच्या व्हिडिओमध्ये टिंडर अ‍ॅपचा इंटरफेसही पाहायला मिळतो. ज्यामध्ये गिलच्या फोटोखाली लिहिले आहे, “तुझा हिरो आला आहे.” या व्हिडिओवर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत आणि विचारत आहेत की सारा वहिनीचे काय होईल?”

हेही वाचा: IND vs AUS: कांगारूंना आपल्या तालावर नाचवण्याआधी टीम इंडियाच्या धुरंधरांनी केला जबरदस्त डान्स, पाहा Video

विशेष म्हणजे शुबमन गिलचे नाव सारा अली खानसोबत जोडले गेले असून कधी कधी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या मुलगी सारावरून देखील चिडवले जात होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा ते विमानतळावर एकत्र दिसले तेव्हा त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या होत्या, तेव्हापासून चाहते गिलला स्टेडियममध्ये सारा-सारा म्हणत चिडवत आहेत पण नक्की कोणती हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 13:53 IST