ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, या परिस्थितीत सर्व न्यूझीलंडमधील नागरिकांनी आम्हा मुस्लीम बांधवांना र्पांठबा दर्शवला, अशा आठवणी न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू एजाझ पटेलने सांगितल्या.

१५ मार्च २०१९ या तारखेला ख्राईस्टचर्च येथील दोन मशिदींवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५० हूनही अधिक जणांनी आपले प्राण गमावले होते. ‘‘दहशतवादी हल्ल्यामुळे न्यूझीलंडमधील मुस्लीम समाजाला खूप धक्का बसला होता. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. नमाजाचे पठण करून घरी परतल्यावर आम्हाला दहशतवादी हल्ल्याबाबत कळले. त्या वेळी पंतप्रधानांसह सर्व न्यूझीलंडवासियांनी आम्हाला र्पांठबा दर्शवला. आमच्यासाठी हे खूप महत्त्वाचे होते,’’ असे एजाझ म्हणाला. न्यूझीलंडसाठी कारकीर्द संपेपर्यंत ८०-९० सामने खेळण्याची इच्छा असल्याचे एजाझने सांगितले.