पीटीआय, बँकॉक

भारताचे थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी उपांत्य फेरीत संपुष्टात आले. भारताचा आघाडीचा खेळाडू लक्ष्य सेनची घोडदौड संघर्षपूर्ण लढतीनंतर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित कुनलावूत वितिदसार्नने २१-१३, १७-२१, १३-२१ अशी रोखली.उपांत्य फेरीच्या लढतीत लक्ष्य प्रत्येक गुणासाठी नेटाने लढला. मात्र, १ तास १५ मिनिटांच्या प्रदीर्घ लढतीनंतर लक्ष्यला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात लक्ष्य प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत पोचला होता.

candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून बरोबरी राहिली होती. मात्र, लक्ष्यने गेमच्या मध्याला ११-६ अशी आघाडी घेत आपली बाजू भक्कम केली. मध्यानंतर कुनलावूतने पिछाडी ११-१० अशी भरून काढली; पण त्यानंतर लक्ष्यच्या झपाटय़ासमोर कुनलावूतला केवळ दोनच गुण मिळवता आले. दुसऱ्या गेममध्ये १०-१० अशी बरोबरी होती. त्यानंतर कुनलावूतने क्रॉसकोर्ट स्मॅशेसच्या फटक्यांसह १२-१० अशी आघाडी मिळवली. लक्ष्यने प्रदीर्घ रॅलीज खेळण्यावर भर देत ड्रॉप शॉट्सचा चांगला वापर केला. मात्र, सलग चार गुणांची कमाई करत कुनलावूतने दुसरा गेम जिंकला.

तिसऱ्या गेममध्ये कुनलावूतने सुरुवातीपासून आघाडी घेताना लक्ष्यवर वर्चस्व राखले. कुनलावूतने ५-२ अशी सुरुवात करून कधीच मागे वळून पाहिले नाही आणि तिसरी गेम आठ गुणांच्या फरकाने जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले.