पीटीआय, बँकॉक

भारताच्या लक्ष्य सेनने सातत्यपूर्ण खेळ करताना शुक्रवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, त्याच वेळी किरण जॉर्जची स्वप्नवत घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली.लक्ष्यने कमालीचा आक्रमक खेळ करताना मलेशियाच्या लेआँग जुन हाओचे आव्हान २१-१९, २१-११ असे संपुष्टात आले. लेआँगने पात्रता फेरीतून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पात्रता फेरीतून उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारताच्या किरण जॉर्जलाही पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोवने किरणला २१-१६, २१-१७ असे पराभूत केले.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

लक्ष्यने यंदाच्या हंगामात प्रथमच आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. यापूर्वीच्या सहा स्पर्धामध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने लक्ष्यची जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानापर्यंत घसरण झाली. मात्र, थायलंड स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य आणि लेआँग यांच्यातील पहिला गेम चुरशीचा झाला. पहिल्या गेमच्या मध्यात लक्ष्य १०-११ असा पिछाडीवर होता. मध्यानंतरही लेआँगचा झपाटा कायम राहिला. लेआँगने एकवेळ १६-१० अशी आपली आघाडी वाढवली. पण, त्यानंतर लक्ष्यने रॅलीजमधील वेग वाढवला आणि जोरकस स्मॅशने लेआँगला निष्प्रभ करत १७-१७ अशी बरोबरी साधली. त्यावेळी लेआँग दमलेला वाटत होता. याचा फायदा घेत लक्ष्यने आपल्या खेळातील आक्रमकता वाढवून पहिला गेम दोन गुणांच्या फरकाने जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये तीच लय कायम राखताना लक्ष्यने ११-८ अशी आघाडी घेतली. गेमच्या मध्यानंतर एकवेळ लक्ष्यची आघाडी १३-११ अशी कमी झाली. मात्र, त्यानंतर लक्ष्यने सलग आठ गुणांची कमाई करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.

दुसऱ्या मानांकित वितिदसार्नचे आव्हान

उपांत्य फेरीत लक्ष्यसमोर दुसऱ्या मानांकित थायलंडच्या कुनलावूत वितिदसार्नचे आव्हान असेल. वितिदसार्नने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या पाचव्या मानांकित लू गुआंग झूचा १८-२१, २१-१४, २१-११ असा पराभव केला.