Premium

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा: लक्ष्य उपांत्य फेरीत

भारताच्या लक्ष्य सेनने सातत्यपूर्ण खेळ करताना शुक्रवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

lakshya sen
लक्ष्य सेन

पीटीआय, बँकॉक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या लक्ष्य सेनने सातत्यपूर्ण खेळ करताना शुक्रवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, त्याच वेळी किरण जॉर्जची स्वप्नवत घोडदौड उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली.लक्ष्यने कमालीचा आक्रमक खेळ करताना मलेशियाच्या लेआँग जुन हाओचे आव्हान २१-१९, २१-११ असे संपुष्टात आले. लेआँगने पात्रता फेरीतून उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पात्रता फेरीतून उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारताच्या किरण जॉर्जलाही पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोवने किरणला २१-१६, २१-१७ असे पराभूत केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thailand open badminton championships lakshya sen in semifinals amy