पीटीआय, बँकॉक

सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अग्रमानांकित भारतीय जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ५०० दर्जा) अंतिम सामन्यात रविवारी चार ‘चॅम्पियनशिप पॉइंट’ वाचवले, पण कामगिरीत सातत्य राखता न आल्याचा त्यांना फटका बसला. अखेरीस त्यांना पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणार्या सा्त्विवक-चिराग जोडीला इंडोनेशियाच्या लियो रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन जोडीकडून ५३ मिनिटांच्या लढतीत १२-२१, २३-२५  असा पराभव पत्करावा लागला. सा्त्विवक-चिरागने २०१९ आणि २०२४ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेत अंतिम लढतीत त्यांना सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

पहिल्या गेममधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय जोडीने दुसर्या गेममध्ये खेळ उंचावला. मात्र, विजय मिळवण्यात त्यांना अपयश आले. गेल्या वर्षी सा्त्विवक-चिराग जोडी चायना मास्टर्स आणि हाँगकाँग खुल्या स्पर्धेतही उपविजेता ठरली होती. लियो आणि डॅनियल या इंडोनेशियन जोडीचा भारतीय जोडीवर हा पहिलाच विजय आहे. याआधी त्यांनी सा्त्विवक-चिराग जोडीविरुद्ध सलग चार सामने गमावले होते.

चिरागला सुरुवातीपासूनच ‘स्व्हिहस’मध्ये संघर्ष करावा लागला. त्यामुळे भारतीय जोडी १-४ अशी पिछाडीवर पडली. भारतीय जोडीच्या चुकांचा फायदा घेत इंडोनेशियाच्या जोडीने १७-१२ अशी आघाडी घेतली. हीच लय कायम राखत त्यांनी गेम जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली. दुसर्या गेममध्ये दोन्ही जोड्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. इंडोनेशियाच्या जोडीने सुरुवातीला ५-३ अशी आघाडी घेतली. मात्र, भारताने पुनरागमन करताना ५-५ अशी बरोबरी साधली. पुढे हा गेम ९-९, १४-१४ आणि १९-१९ असा बरोबरीतच सुरू होता. यानंतर इंडोनेशियाच्या जोडीने २०-१९ अशी आघाडी घेत आपला पहिला ‘चॅम्पियनशिप पॉइंट’ मिळवला. मात्र, सा्त्विवक-चिराग जोडीने २०-२० अशी बरोबरी साधली. भारतीय जोडीने यानंतर तीन ‘चॅम्पियनशिप पॉइंट’ वाचवले. मात्र, लियो आणि डॅनियल पाचव्या ‘चॅम्पियनशिप पॉइंट’ची संधी साधली आणि दुसरा गेम २५-२३ असा जिंकत जेतेपद निश्चित केले.

२ सा्त्विवक-चिरागने कामगिरीत सातत्य राखले असले, तरी दोन वर्षांत त्यांना ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर’चा भाग असलेली कोणतीही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यांनी अखेरचे जेतेपद मे २०२४ मध्ये मिळवले होते.

आम्हाला गेल्या काही काळात विविध दुखापतींचा सामना करावा लागला आहे. त्यातून सावरत थायलंड स्पर्धेत केलेल्या एकंदर कामगिरीबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र, अंतिम लढतीत आम्हाला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. शारीरिकपेक्षा मानसिक गोष्टी याला कारणीभूत आहेत. आम्ही स्वत:च्या क्षमतेवर अधिक विश्वास राखणे गरजेचे आहे. आता आम्हाला हळूहळू लय सापडते आहे. आम्ही लवकरच विजेतीपदे मिळवण्यास सुरुवात करू अशी आशा आहे. – सा्त्विवकसाईराज रंकीरेड्डी