Women Umpire’s Funny Video Social Media Viral : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट यांच्यात आज तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. हा सामना पावसामुळे व्यत्यय आल्याने पाच षटकांची कपात करण्यात आली. त्यामुळे हा सामना ४५-४५ षटकांचा झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने ४५ षटकांत २२९ धावा केल्या. सामन्यादरम्यान एक मजेदार घटना घडली. सामन्यात अंपायरिंग करणाऱ्या मैदानावरील अंपायरने नॉट आऊट ऐवजी आऊट देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, ही संपूर्ण घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या २४व्या षटकात घडली. ऑस्ट्रेलियासाठी ॲश्ले गार्डनर हे षटक टाकत होती. या षटकातील पाचवा चेंडू आफ्रिकेची फलंदाज सन लुसच्या पॅडला लागला. ज्यावर ऑस्ट्रेलियन संघाने मोठी अपील केली. मात्र, मैदानावरील पंचांनी तिला नॉट आऊट घोषित केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार ॲलिसा हिलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.

डीआरएसमध्ये, थर्ड अंपायरला चेंडू स्टंप सोडून बाहेर जाताना दिसला. त्यामुळे स्क्रीनवर नॉट आऊटचे चिन्ह दिसले आणि मैदानावरील अंपायरला आपला निर्णय कायम ठेवण्यास सांगितले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने डीआरएस गमावला आहे. मात्र, मैदानावरील अंपायर गोंधळली आणि तिने चुकून आऊट बोट वर करुन आऊटचा इशारा दिला.मात्र, तिला लगेचच आपली चूक लक्षात आली आणि तिने डीआरएस गमावण्याचा इशारा दिला. अंपायरचा हा गोंधळ पाहून मैदानावर उपस्थित सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू हसू लागले.

हेही वाचा – ICC : बुमराहने कसोटी क्रमवारीत अश्विनला मागे टाकत रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज

या घटनेचा अंपायरचा मजेदार व्हिडीओ क्रिकेट डॉट कॉम एयूने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांची या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर तो आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. या वनडे मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. अशा स्थितीत कांगारू संघाने आजचा सामना जिंकल्यास या मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The funny video of the umpire in the australia vs south africa womens odi match is going viral vbm
First published on: 07-02-2024 at 16:18 IST