The Indian team will play two hands today to win the series in the deciding match against Australia avw 92 | Loksatta

Ind vs AUS 3rd T20: विराट-सूर्यकुमारची भन्नाट फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिकाही

India and Australia 3rd T20 Highlights Score: भारतीय संघाने या सामन्यात १८७धावांचा ६ गडी राखून यशस्वी पाठलाग करत ही मालिका आपल्या नावे केली.

Ind vs AUS 3rd T20: विराट-सूर्यकुमारची भन्नाट फलंदाजीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिकाही
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० सामना, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० लाइव्ह

Ind vs AUS 3rd T20 highlights Score Updates: आशिया चषकातील पराभवानंतर भारतीय संघ जोरदार ट्रोल झाला होता. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियावरआजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही २-१ अशी जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवता आली. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची खेळी साकारली.

खेळपट्टीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करत भारतीय संघाला बांधून ठेवले होते. त्यामुळे भारताला मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सलामीवीर तंबूत परतल्याने भारतीय संघ अडचणीत आला. पहिल्या सहा षटकात भारत ५० धावा केल्या. लामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि सुर्याकुमार यादवने डाव सावरला आणि ३६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दहा षटकात ९१ धावा केल्या आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनने तुफान फटकेबाजी करत ५ षटकात ६१ धावा करून दिल्या. १९ चेंडूत त्याने ५० धावा करत अर्धशतक साजरे केले. पण त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात परत आला आहे. पहिले १० षटके ही दोन्ही संघांसाठी समसमान राहिली आहेत. आधीच्या फटकेबाजी नंतर भारतीय संघाने चार गडी बाद करत सामन्यात रंगत आणली आहे.

Live Updates

India and Australia 3rd T20 Highlights; भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० सामना हायलाइट्स

22:34 (IST) 25 Sep 2022
२ चेंडूत ४ धावांची गरज

२ चेंडूत ४ धावांची गरज भारत १८३-४

22:31 (IST) 25 Sep 2022
विराट कोहली बाद

अखेरच्या षटकात विराट कोहली बाद झाला. त्याने ६३ धावा केल्या. भारत १८२-४

22:24 (IST) 25 Sep 2022
शेवटच्या दोन षटक महत्वाची

शेवटच्या दोन षटक भारतासाठी महत्वाची आहे. त्यात भारताला २१ धावांची गरज

भारत १६६-३

22:09 (IST) 25 Sep 2022
विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने ३७ चेंडूत अर्धशतक झळकावले. भारत १४७-३

22:01 (IST) 25 Sep 2022
ऐनवेळी सुर्यकुमार यादव बाद

ऐनवेळी सुर्यकुमार यादव बाद झाल्याने आता सगळी जबाबदारी विराट कोह्लीवर आली आहे. भारत १३४-३

21:59 (IST) 25 Sep 2022
विराट आणि सुर्यकुमार यादव यांच्यात १०० धावांची भागीदारी

विराट आणि सुर्यकुमार यादव यांच्यात १०० धावांची भागीदारी झाली असून त्या भागीदारीने भारताला विजया दृष्टीने एक पाऊल टाकले. भारत १३२-२

21:54 (IST) 25 Sep 2022
सुर्यकुमार यादवचे अर्धशतक

सुर्यकुमार यादवने गगनभेदी षटकार मारत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारत ११५-२

21:38 (IST) 25 Sep 2022
सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि सुर्याकुमार यादवने डाव सावरला

सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि सुर्याकुमार यादवने डाव सावरला आणि ३६ चेंडूत ५० धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या दहा षटकात ९१ धावा केल्या आहे.

भारत ९१-२

21:22 (IST) 25 Sep 2022
पहिल्या पॉवर प्ले मध्ये भारताची अडखळत सुरुवात

खेळपट्टीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करत भारतीय संघाला बांधून ठेवले. त्यामुळे भारताला मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. पहिल्या पॉवर प्ले मध्ये सलामीवीर तंबूत परतल्याने भारतीय संघ अडचणीत आला. भारत ५०-२

21:13 (IST) 25 Sep 2022
रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा झटका

रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा झटका बसला आहे. त्याच्या बाद होण्याने ऑस्ट्रेलिया सामन्यात वरचढ झाली आहे. त्याने १४ चेंडूत १७ धावा केल्या. भारत ३०-२

21:00 (IST) 25 Sep 2022
भारताची सलामी जोडी मैदानात आली आणि केएल राहुल स्वस्तात माघारी

भारताची सलामी जोडी मैदानात आली आणि लगेचच केएल राहुल बाद झाला. तो अवघी एक धाव करून बाद झाला. भारत ५-१

20:43 (IST) 25 Sep 2022
भारताला १८७ धावांचे आव्हान

भारताला १८७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने दिले आहे. ऑस्ट्रेलिया १८६- ७

20:41 (IST) 25 Sep 2022
अर्धशतकनंतर डेविड बाद

अर्धशतकनंतर डेविड बाद झाला. हर्षल पटेलला मिळाला त्याचा पहिला बळी, डेविड २७ चेंडूत ५४ धावा करत आपली विकेट गमावली. ऑस्ट्रेलिया १८५-७

20:39 (IST) 25 Sep 2022
टिम डेविडचे अर्धशतक

टिम डेविडने षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया १८५-६

20:26 (IST) 25 Sep 2022
ऑस्ट्रेलियन डावाची तीन षटके बाकी

ऑस्ट्रेलियन डावाची तीन षटके बाकी असून ती भारतीय संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. कारण अखेरच्या षटकांत भारत नेहमी धावा जास्त देतो. त्यामुळे सामन्यावर असलेली पकड अशीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ऑस्ट्रेलिया १४०-६

20:13 (IST) 25 Sep 2022
एकाच षटकात अक्षरने दिले दोन धक्के

एकाच षटकात अक्षरने दोन धक्के देत ऑस्ट्रेलियाला बॅक फुट वर ढकलले आहे. मागच्या सामन्यात तुफानी खेळी करणारा मॅथ्यू वेड अवघी एक धाव काढून बाद झाला.

ऑस्ट्रेलिया ११७-६

20:09 (IST) 25 Sep 2022
अक्षरने जोश इंग्लिसला केले बाद

अक्षरने जोश इंग्लिसला बाद केले असून भारतीय संघाने सामन्यावर पकड तयार करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया ११५-५

19:59 (IST) 25 Sep 2022
ऑस्ट्रेलिया संघाच्या १०० धावा पूर्ण

ऑस्ट्रेलिया संघाच्या १०० धावा पूर्ण झाल्या असून त्यांनी त्या १३ षटकांत केल्याने भारतीय संघावर धावा रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलिया १०३ -४

19:47 (IST) 25 Sep 2022
युझवेंद्र चहलने स्मिथला केले बाद

युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला बाद केले. त्याने १० चेंडूत ९ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ८४-४

19:38 (IST) 25 Sep 2022
ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का ग्लेन मॅक्सवेल बाद

अक्षर पटेलच्या उत्कृष्ट थ्रो ने ग्लेन मॅक्सवेल बाद झाला त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ७५-३

19:31 (IST) 25 Sep 2022
अक्षर पटेलने स्मिथला दिले जीवदान

मालिकेत हार्दिकच्या गोलंदाजीवर दुसऱ्यांदा झेल सोडला. अक्षर पटेलने स्मिथला जीवदान दिले. ७ षटकानंतर ऑस्ट्रेलिया ७१-२

19:28 (IST) 25 Sep 2022
पहिल्या पॉवर प्ले नंतर ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले नंतर ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया ६६-२

19:24 (IST) 25 Sep 2022
भारतला मोठे यश कॅमेरॉन ग्रीन बाद

भारतला मोठे यश मिळाले. कॅमेरॉन ग्रीनने २१ चेंडूत ५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ६२-२

19:21 (IST) 25 Sep 2022
कॅमेरॉन ग्रीनचे अर्धशतक

कॅमेरॉन ग्रीनचे करो या मरो सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याने १९ चेंडूत ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ५८-१

19:16 (IST) 25 Sep 2022
अक्षर पटेलला मिळाली पहिली विकेट

अक्षर पटेलला पहिली विकेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरॉन फिंच बाद झाला. त्याने ६ चेंडूत ७ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया ४४-१

19:13 (IST) 25 Sep 2022
कॅमेरॉन ग्रीनची फटकेबाजी सुरु

कॅमेरॉन ग्रीनची फटकेबाजी सुरु झाली असून त्याला लवकरात लवकर बाद करणे भारतीय संघाला आवश्यक आहे. तीन षटकानंतर ऑस्ट्रेलियाने उत्तम सुरुवात केली आहे.

ऑस्ट्रेलिया ४०-०

19:04 (IST) 25 Sep 2022
पहिल्या षटकात कॅमेरॉन ग्रीनची आतषबाजी

अंतिम सामन्याला सुरुवात झाली असून भूवीच्या पहिल्या चेंडूवर फटका हवेत मारला होता पण पांड्या तिथेपर्यंत पोहचला नाही. पहिल्या षटकात कॅमेरॉन ग्रीनची आतषबाजी सुरु झाली. एक षटकार आणि एक चौकार मारले.

ऑस्ट्रेलिया १२-०

18:46 (IST) 25 Sep 2022
दोन्ही संघांचे अंतिम अकरा खेळाडू

भारत:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया:

ॲरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा

18:34 (IST) 25 Sep 2022
ॠषभ पंत ऐवजी भुवनेश्वर कुमार संघात

ॠषभ पंत ऐवजी भुवनेश्वर कुमारला अंतिम संघात रोहित शर्माने स्थान दिले. तर ऑस्ट्रेलियाने जोश इंग्लिसला शॉन ॲबॉट ऐवजी संधी दिली.

18:32 (IST) 25 Sep 2022
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

18:18 (IST) 25 Sep 2022
खेळपट्टीचा अंदाज

सुनील गावसकर यांनी खेळपट्टीचा अंदाज सांगताना त्यांनी म्हटले की, खेळपट्टीवर अजिबात गवत नाही. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. अश्विनला संघात स्थान मिळू शकते, मैदानावर चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते असेही ते म्हणाले.

18:09 (IST) 25 Sep 2022
थोड्यावेळातच होणार नाणेफेक

आजच्या सामन्यात नाणेफेक महत्वाची आहे. कारण मागील काही सामन्यात जो धावांचा पाठलाग करतो तोच सामना जिंकतो असे समीकरण झाले आहे.

India and Australia 3rd T20Highlights: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० सामना हायलाइट्स: भारताने सहा गडी राखत ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी२० मालिका २-१ अशी जिंकली.

Next Story
Ind vs AUS 3rd T20: हैदराबाद येथे होणाऱ्या टी२० सामन्याच्या तिकीट विक्रीत कुठलाही घोळ झाला नाही, मोहम्मद अझरुद्दीनचे स्पष्टीकरण

संबंधित बातम्या

IND vs BAN 3rd ODI: पठ्याने मैदान मारलं! थाटात द्विशतकीय क्लबमध्ये इशान किशनचे दाखल
IND vs BAN 3rd ODI: इशान किशनने बांगलादेशमधील पहिल्याच सामन्यात झळकावले धडाकेबाज दीड शतक; धवन सुपर फ्लॉप
विश्लेषण: केवळ नेयमारवर अवलंबून राहणे ब्राझीलला महागात पडले? पराभवामागे काय होती कारणे?
नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”
IND vs BAN Test Series: ‘हा’ गोलंदाज असणार मोहम्मद शमीचा बदली खेळाडू; १२ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण: केवळ नेयमारवर अवलंबून राहणे ब्राझीलला महागात पडले? पराभवामागे काय होती कारणे?
“मी जर मुख्यमंत्री असतो ना…”, अब्दुल सत्तारांचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं!
IND vs BAN 3rd ODI: पठ्ठ्याने मैदान मारलं! इशान किशन थाटात द्विशतकीय क्लबमध्ये दाखल
‘वेड’नंतर आता जिनिलीया देशमुखची मराठी मालिकेत एंट्री; प्रोमो व्हायरल
IND vs BAN 3rd ODI: इशान किशनने बांगलादेशमधील पहिल्याच सामन्यात झळकावले धडाकेबाज दीड शतक; धवन सुपर फ्लॉप