माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांच्या संस्थेला वांद्रे येथे २१,३४८ चौरस फूट लीजवर जमीन दिली आहे. सुनिल गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला ही जमीन ३३ वर्षांपूर्वी इंनडोअर क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी दिली होती. या जमिनीवर आता क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभं राहणार आहे. इतकी वर्षे मोकळा राहिलेला भूखंड वापरात येणार आहे. या भूखंडावर हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जिम्नॅशिअर, स्विमिंग, पुल, स्क्वॅश तसेच प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व्यवस्था आणि स्पोर्ट्स कॅफेटेरिया इत्यादी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सुनिल गावस्कर क्रिकेट फाउंडेशनच्या विनंतीनुसार बॅडमिंटन, फुटबॉल, टेबल टेनिल या खेळांना देखील परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी, खेळाडू यांना दुखापत झाल्यास त्यांच्यावर स्पोर्ट्स मेडिसीन सेंटर उभारण्याची देखील परवानगी दिली आहे.

खेळ प्रशिक्षण केंद्राला इनडोअर क्रिकेट स्टेडियम ऐवजी “मल्टी फॅसिलिटीज स्पोर्ट्स सेंटर विथ इनडोअर व आऊटडोअर फॅसिलिटीज” असं नाव देण्याची मान्यता दिली आहे. गावस्कर यांनी जानेवारी महिन्यात अर्ज करत नवे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर म्हाडाने ती मान्य केली आहे. दुसरीकडे भाडे करारनामा झाल्यावर ताबा मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत करारनामा करत बांधकाम सुरू करावे आणि ३ वर्षाच्या आत प्रयोजनासाठी वापत सुरू करावा अशी जी नेहमी अट असते ती घातली आहे.

VIDEO: आला रे आला… मुंबई इंडियन्सचं नवं Anthem; नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

दुसरीकडे, खेळ प्रशिक्षण केंद्रातून मिळणाऱ्या नफ्याच्या प्रमाणित रकमेपैकी २५ टक्के एवढी रक्कम शासनाकडे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत