Pune franchise appoints Ruturaj Gaikwad as captain: आयपीएल २०२३ चे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला हरवून जिंकले. सीएसकेची ही पाचवी ट्रॉफी आहे. ऋतुराज गायकवाडने सीएसके संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने सीएसकेसाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. आता ऋतुराज गायकवाडला आयपीएल जिंकल्यानंतर लॉटरी लागली आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ मध्ये, पुणे फ्रँचायझीने त्याला आपल्या संघाचा कर्णधार नियुक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे फ्रँचायझीकडून विक्रमी १४.८० कोटी रुपये मिळाले –

महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये ६ संघ सहभागी होणार आहेत. १५ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून सर्व सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहेत. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पुणे फ्रँचायझीकडून विक्रमी १४.८० कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच एमसीएला सहा संघाकडून एकूण ५७.८० कोटी रुपये प्राप्त झाले. पुण्यानेच ऋतुराज गायकवाडवर आयकॉन खेळाडू म्हणून बोली लावली होती. आता त्याला या फ्रँचायझीचा कर्णधारही बनवण्यात आले आहे.

सीएसकेला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली –

ऋतुराज गायकवाडने एकट्याने सीएसके संघाला आयपीएल २०२१ चे विजेतेपद मिळवून दिले होते. तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर यंदाच्या मोसमातही त्याची बॅट जबरदस्त तळपली आहे. त्याने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करताना ट्रॉफी मिळवण्यात देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तो स्फोटक फलंदाजीत माहिर आहे आणि अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याची दिशा बदलतो. ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२३ च्या १६ सामन्यांमध्ये ५९० धावा केल्या आहेत, ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय गायकवाडने भारतासाठी १ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत.

सहा संघांकडून मिळाले ५७.८० कोटी रु. –

एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी खुलासा केला की फ्रेंचायझी लिलावात राज्याला २० हून अधिक संस्थांकडून बोली लागल्या. सहा संघांच्या विक्रीतून व्यवस्थापनाला १८ कोटी रुपयांची अपेक्षा होती, परंतु अपेक्षित मूल्यांकनाच्या तिप्पट मूल्यांकन मिळाले, असेही ते म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, “आम्ही एमपीएलसाठी किमान किंमत १८ कोटी रुपये अपेक्षित धरून सहा संघांसाठी तीन वर्षांसाठी प्रति वर्ष १ कोटी रुपये आधारभूत किंमत ठेवली होती.” परंतु रविवारी झालेल्या संघांच्या लिलावानंतर सहा संघांकडून तीन वर्षांसाठी ५७.८० कोटी रु. मिलाले. खुल्या बोली प्रणालीद्वारे मालकी खरेदी करण्यासाठी आम्ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रियेचे पालन केले.”

हेही वाचा – Sakshi Murder Case: गुजरात टायटन्सचा बॉलर यश दयाल इन्स्टाग्राम स्टोरीमुळे अडचणीत; ‘लव्ह जिहाद’ची ‘ती’ पोस्ट डिलीट करत मागितली माफी!

ऋतुराज गायकवाडने उत्कर्षा पवारशी बांधली लग्नगाठ –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील स्टँडबाय खेळाडूंपैकी एक म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली होती. मात्र ४ जून रोजी त्याचे लग्न असल्यामुळे त्याने आपले नाव मागे घेतले. त्याने महाराष्ट्राची क्रिकेटपटू उत्कर्षा पवार हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pune franchise has appointed ruturaj gaikwad as their captain in the mpl 2023 tournament vbm
First published on: 05-06-2023 at 19:47 IST