scorecardresearch

‘… अखेर विराट कोहलीला भेटलो भाई’; स्टार क्रिकेटरला भेटल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

Virat Kohli Fans Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली सराव सत्रत व्यस्त आहे. दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Virat Kohli Fans Video Viral
विराट कोहली आणि चाहते (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विराट कोहली हा असा क्रिकेटपटू आहे की, ज्याला भेटण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक असतात. तो क्रिकेटर स्वतः समोर आल्यावर क्षण कसा असेल? साहजिकच कोणत्याही चाहत्यासाठी यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकत नाही. कोहलीचा असाच एक फॅन मोमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टार क्रिकेटरला भेटायला आलेले चाहते आनंदी झाले आहेत.

वास्तविक, विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत ऋषिकेशमध्ये सुट्टीवर गेला होता. जिथे त्याने नुकतेच ते नीम करोली बाबांचे दर्शन घेतले होते. त्यावेळी विराट कोहलीला भेटायला त्याचे चाहते आले होते. तेव्हाचा व्हिडिओ आहे. कारण विराट कोहली सध्या नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सराव करत आहे.

अखेर विराट कोहलीला भेटलो भाई –

कोहलीला काही चाहत्यांनी घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या चाहत्यांसोबत फोटो काढल्यानंतर कोहली म्हणतो, आता फोटो काढू नका. यानंतर बाईकवर दोन मुले बसलेली दिसतात, त्यापैकी मागे बसलेला मुलगा म्हणतो, ‘शेवटी विराट कोहलीला भेटलो भाई’. यानंतर बाईक चालवणारा मुलगा म्हणतो की, ‘जेव्हा मी त्याला (विराट) फोटो नीट येत नसल्याचे सांगितले. तेव्हा कोहलीने त्याचा अंगरक्षक बाजूला हटवला. मग माझ्या खांद्यालक हात ठेवून फोटो काढला. यानंतर मुलगा होस्स म्हणत उत्तेजित झाल्याचा दिसतो.

विराट कोहलीच्या चाहत्यांचा व्हायरल व्हिडिओ

कोहलीला भेटण्याची आमची पात्रता नाही –

त्यानंतर मागचा मुलगा म्हणतो, ‘मोमेंट ऑफ लाइफ ठरला यार. जय नीम करोली बाबा, त्यांच्यामुळे आज दर्शन झाले, नाहीतर भाई विराट कोहलीला भेटण्याची आमची पात्रता नाही.’

हेही वाचा – T20 WC 2024: ‘रोहित शर्मा नव्हे, तर विराट कोहली खेळणार पुढचा टी-२० विश्वचषक’; माजी खेळाडूची भविष्यवाणी

भाई पहाटे साडेचारला उठलो आणि अंघोळ केली –

मग समोर बाईकवर बसलेली काही मुलं म्हणतात, ‘विराटला भेटून मजा आली.’ यानंतर बाईक चालवणाऱ्या मुलाने पुन्हा एकदा त्याच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणतो, ‘भाई, साडेचार वाजता उठून आंघोळ केली. कारण मला विराट भाईला भेटायला मंदिरात यायचे होते, माझे मन सांगत होते की ते आज येतील. दोन्ही बाईकवर बसलेली मुलं मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसली.’

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:54 IST