scorecardresearch

Mohammed Shami: योगी सरकारने घेतला मोठा निर्णय! मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार स्टेडियम

IND vs AUS World Cup 2023 Final : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोहम्मद शमीचे गाव सहसपूर अलीनगरमध्ये स्टेडियम बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे.

Mohammad Shami will have a stadium in his hometown
मोहम्मद शमीच्या गावी स्टेडियम बांधले जाणार (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Decision to build a stadium in Mohammad Shami’s hometown : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघाची सर्वात मोठी आशा आहे. उपांत्य फेरी गाठेपर्यंत तो गोलंदाजीचा कणा बनला होता. शमीने उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट घेतल्या होत्या. तेव्हापासून देशात आणि जगात सर्वत्र शमी-शमीचा आवाज घुमत आहे. आता त्याचे मूळ गाव अमरोहाला शमीच्या कारनाम्यांचा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने त्याच्या गावी सहसपूर अलीनगरमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे.

मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार मिनी क्रिकेट स्टेडियम –

अमरोहाच्या गल्ल्यांमधून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय जगतात प्रसिद्ध झालेले नाव म्हणजे मोहम्मद शमी. विश्वचषकातील त्याच्या कामगिरीने देशवासीयांना अभिमान वाटला. आता अमरोहाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शमीच्या गावात सहसपूर अलीनगरमध्ये मिनी स्टेडियम आणि ओपन जिम बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

ojas-deotale
“ओजसची कामगिरी नागपूरचे नाव जगात उंचावणारी” जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
Shiv Sena Thackeray group is implementing Hou Dya Charcha campaign
केंद्र, राज्याच्या योजना फसव्या; आता ‘होऊ द्या चर्चा’!
Koradi Thermal Power Plant
नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्प विस्तारीकरणावर उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस
Kunbi OBC Movement nagpur
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीचा कुणबी-ओबीसी आंदोलनाला पाठिंबा, आंदोलन मंडपात लावली हजेरी

अमरोहाचे जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी म्हणाले, “आम्ही मोहम्मद शमीच्या गावात मिनी स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव पाठवत आहोत. या प्रस्तावात खुली व्यायामशाळाही असणार आहे. शमीच्या गावात यासाठी पुरेशी जमीन आहे.”

हेही वाचा – IND vs AUS Final : वर्ल्डकप फायनलमध्ये केटलबोरो असणार मैदानी पंच, भारतीयांच्या पोटात भीतीचा गोळा! कारण काय?

जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी आणि मुख्य विकास अधिकारी अमरोहा यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा प्रशासनाच्या पथकाने शमीच्या सहसपूर अलीनगर गावाला भेट दिली होती. मिनी स्टेडियम आणि ओपन जीम बांधण्यासाठी जमिनीच्या शोधात टीम तिथे पोहोचली होती. मोहम्मह शमीप्रमाणे खेळात प्रगती करण्यासाठी त्यांच्या भागातील तरुणांना मदत करणे हा यामागचा उद्देश आहे.

अमरोहाचे जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी पुढे म्हणाले, “यूपी सरकारने राज्यभरात २० स्टेडियम बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भात अमरोहा जिल्ह्यातील मोहम्मद शमीच्या गावाची स्टेडियम बांधण्यासाठी निवड करण्यात आली आहे.”

हेही वाचा – IND vs AUS Final: एकदिवसीय विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया किती वेळा आलेत आमनेसामने, जाणून घ्या कोणाचे आहे वर्चस्व?

दमदार कामगिरीने मोहम्मद शमीने सिद्ध केली आपली क्षमता –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पहिल्या चार सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर शमीचा पुढील सामन्यात संघात समावेश करण्यात आला. त्यावेळी गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध त्याला पहिली संधी मिळाली. त्या सामन्यात शमीने पाच विकेट्स घेत दमदार सुरुवात केली. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध चार आणि श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs AUS Final: माजी दिग्गजाने सांगितली ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी कमतरता, टीम इंडिया फायनलमध्ये फायदा उचलणार का?

त्याचबरोबर आपली शानदार कामगिरी कायम ठेवली. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात शमीने प्रथम दोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यानंतर ठराविक अंतराने विकेट घेत एकूण सात बळी घेतले. यासह शमी विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The yogi government of uttar pradesh decided to build a stadium in sahaspur alinagar the hometown of mohammed shami vbm

First published on: 18-11-2023 at 11:39 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×