scorecardresearch

IPL 2023: पंजाब संघाला मोठा धक्का; ‘हा’ स्फोटक इंग्लिश फलंदाज आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता

Jonny Bairstow Updates:आयपीएल २०२३ च्या आधी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख खेळाडू जॉनी बेअरस्टो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. तंदुरुस्त झाल्यामुळे तो ऍशेस मालिका आणि स्पर्धेतून बाहेर असेल.

ipl 2023 Punjab Kings Johnny Bairstow
पंजाब किंग्ज (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

IPL 2023 Updates: आयपीएल २०२३ सुरू होण्यासाठी फक्त १० दिवस बाकी आहेत. त्याआधी पंजाब किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे, कारण संघाचा प्रमुख खेळाडू जॉनी बेअरस्टो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. एक प्रकारे, तो बाहेर गेला आहे, फक्त अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. तो सध्या दुखापतीशी झुंज देत असून अद्याप व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकलेला नाही.

सप्टेंबर २०२२ मध्ये, डाव्या हाताचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला गोल्फ खेळताना फ्रॅक्चर झाले होते. त्याच्या पायाचा घोटा आणि अस्थिबंधनात समस्या आहे, ज्यातून तो अद्याप बरा झालेला नाही. याच कारणामुळे तो २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही आपल्या देशासाठी खेळला नाही. त्यामुळे तो अनेक दौऱ्यांवर कसोटी संघाचा भागही नव्हता. यामुळेच तो आयपीएलला मुकणार आहे.

ऍशेस मालिकेवर लक्ष केंद्रित करणार –

द गार्डियनमधील वृत्तानुसार, त्याने आपल्या पुनर्प्राप्तीवर आणि जूनमध्ये सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ वर्षीय फलंदाजाने नेटमध्ये पुनरागमन केले आहे. परंतु अद्याप तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्याला मैदानात परतण्याची घाई नाही. या कारणामुळे तो आयपीएल २०२३ मधून माघार घेणार आहे.

बेअरस्टोची आयपीएल कारकीर्द –

बेअरस्टोने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 39 सामने खेळले असून 35.86 च्या सरासरीने 1,291 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १४२.६५ राहिला आहे. त्याने एक शतक आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

पंजाब संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे –

यावेळी पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. पंजाब लीगच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल, जिथे त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल.

आयपीएल २०२३ साठी पंजाब किंग्ज संघ:

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो (जखमी), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, सॅम कुरान, सिकंदर रझा, विद्वत कवेरप्पा, शिवम सिंग, हरप्रीत भाटिया, मोहित राठी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 21:36 IST

संबंधित बातम्या