गॉल कसोटीत श्रीलंकेवर मात केल्यानंतर कोलंबो कसोटीच्या पहिल्या दिवशीही भारताने श्रीलंकेवर चांगलीच कुरघोडी केली आहे. पहिले ३ गडी लवकर तंबूत परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी २३१ धावांची नाबाद भागीदारी केली. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनीही यादरम्यान आपलं शतक साजरं केलं.

पहिल्या दिवसाच्या खेळात भारत आणि श्रीलंकेच्या खेळाडूंकडून तब्बल १४ विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.

– भारताचा अपवाद वगळता याआधी एकाही देशाने कसोटी मालिकेत पहिल्या दिवशी ३०० पेक्षा अधिक धावा केल्या नाहीयेत.

– दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला मागे टाकत चेतेश्वर पुजारा २०१७ या वर्षात कसोटीत सर्वाधीक धावा करणारा फलंदाज ठरलाय.

– भारतासाठी सर्वात जलद ४ हजार धावा काढणारा चेतेश्वर पुजारा संयुक्तरित्या दुसरा फलंदाज ठरला.

– श्रीलंकेत सलग ३ कसोटींमध्ये ३ शतक करण्याचा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर.

– एकाच वर्षात दोन षटकार ठोकण्याची चेतेश्वर पुजाराची ही तिसरी वेळ आहे. याआधी २०१५ आणि २०१६ साली चेतेश्वरने ही कामगिरी केली होती.

– सर्वाधीक प्रथमश्रेणी सामने खेळून राष्ट्रीय संघात पदार्पण करणारा मलिंदा पुष्पकुमारा श्रीलंकेचा चौथा खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम दिलरुवान पेरेराच्या नावे होता. पेरेराने १४० प्रथमश्रेणी सामने खेळून राष्ट्रीय संघात पदार्पण केलं होतं.

– ५० व्या कसोटीत ४ हजार धावांचा टप्पा पार करणारा चेतेश्वर पुजारा पाचवा खेळाडू ठरला.

– सलग सहा सामन्यांमध्ये लोकेश राहुलची अर्धशतकी खेळी. याआधी राहुल द्रविड आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावे असा विक्रम आहे.

– आपल्या ५० व्या कसोटीत शतक ठोकणारा चेतेश्वर पुजारा सातवा फलंदाज ठरला, याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने अशी कामगिरी केली आहे.

– अजिंक्य रहाणेचं नववं कसोटी शतक, भारताबाहेर केलेलं सहावं शतक.

१० – दहा कसोटींनंतर श्रीलंका पहिल्यांदाच कोलंबोच्या मैदानात नाणेफेक हरली आहे.

५० – चेतेश्वर पुजाराची ही ५० वी कसोटी ठरली. असा विक्रम करणारा तो ३१ वा भारतीय खेळाडू ठरला. याआधी गॉल कसोटीत रविचंद्रन अश्विननेही हा विक्रम केला होता.

५६ – एका डावात दुसरा गोलंदाज म्हणून रंगना हेरथच्या नावे ५६ बळी. भारताचा रविचंद्रन अश्विन या यादीत ६० बळींसह अव्वल स्थानावर आहे.

१६४ – शतक साजरं करण्यासाठी चेतेश्वर पुजाराने तब्बल १६४ चेंडु खर्ची घातले. हे पुजाराचं तिसरं सर्वाधीक जलद शतक ठरलंय.