Fastest Century In IPL History : आयपीएलमध्ये सर्वात वेगवान आणि सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये ६ वादळी शतक ठोकणाऱ्या गेलने २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरकडून खेळताना चिन्नास्वामी स्डेडियममध्ये टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी केली आणि सर्वात कमी चेंडूत १०० धावा केल्या. ख्रिस गेलने फक्त ३० चेंडूतच शतकी खेळी केली. गेलने मैदानात १३ चौकार आणि १७ षटकारांचा पाऊस पाडत ६६ चेंडूत १७५ धावा कुटल्या. ख्रिस गेलने हा शतक पुणे वॉरियर्सच्या विरोधात झालेल्या सामन्यात ठोकला होता.

भारतीय संघांचा पिंच हिटर म्हणून ओळखला जाणारा यूसुफ पठाणही आयपीएमध्ये चमकला होता. पठाण भारताचा एकमेव फलंदाज आहे, ज्याने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकलं आहे. गेलनंतर वेगवान शतक ठोकण्याच्या लिस्टमध्ये पठाणच्या नावाचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पठानने ३७ चेंडूत १०० धावांची वादळी खेळी केली होती. या इनिंगमध्ये यूसुफ पठानने ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले होते.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Who are the top five bowlers who have dismissed batsmen most times on duck in IPL history
IPL 2024 : लसिथ मलिंगासह ‘या’ पाच गोलंदाजांनी आयपीएल इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना केलय शून्यावर बाद
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Updates in Marathi
DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य
List of Mahendra Singh Dhoni's records
DC vs CSK : माहीने दिल्लीविरुद्ध दमदार फटकेबाजी करत लावली विक्रमांची रांग, पाहा संपूर्ण यादी

नक्की वाचा – IPL मध्ये भोपळाही फोडला नाही! १४ वेळा शून्यावर झाले बाद; ‘या’ दोन दिग्गज फलंदाजांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आयपीएलमध्ये किलर मिलर म्हणून लोकप्रिय असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरनेही आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. २०२३ मध्ये मोहालीच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना डेविड मिलरने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. मिलरने ३८ चेंडूत १०१ धावांची शतकी खेळी साकारली होती. मिलरने या इनिंगमध्ये ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले होते.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज एडम गिलक्रिस्टने २००९ मध्ये आयपीएलमधील सर्वात वेगवान पहिलं शतक ठोकलं होतं. त्यावेळी हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्सचं नेतृत्व करणाऱ्या गिलक्रिस्टने ४२ चेंडूत १०० धावांची खेळी केली होती. या इनिंगमध्ये गिलक्रिस्टने ९ चौकार आणि १० षटकारांचा पाऊस पाडत १०९ धावांची खेळी साकारली होती.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या लिस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स पाचव्या क्रमांकावर आहे. १४ मे २०१६ मध्ये आरसीबीकडून खेळताना गुजरात लायन्सच्याविरोधात एबी डिविलियर्सने ४२ चेंडूत शतक ठोकलं होतं. या सामन्यात डिविलियर्सने ५२ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीनं नाबाद १२९ धावा कुटल्या होत्या.