देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी आकाश अंबानी याचा पहिला वाढदिवस आज १० डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. पृथ्वीचा वाढदिवस जामनगर (गुजरात) येथील अंबानींच्या फार्महाऊसवर मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या बर्थडे पार्टीसाठी १२० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी, रणबीर कपूर, आलिया भट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, पार्थ जिंदाल या दिग्गज व्यक्तींशिवाय आजी-माजी क्रिकेटपटूही उपस्थित असतील.

या सोहळ्याला सचिन तेंडुलकर आणि झहीर खान हे दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित असतील. तर टीम इंडियाचा नवा कप्तान रोहित शर्मा, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हे क्रिकेटपटूही जामनगरला पोहोचले आहेत. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सर्व व्हीआयपी पाहुण्यांना चार्टर्ड विमानातून बोलावण्यात आले आहे. यावेळी अंबानी परिवाराकडून ५० हजार ग्रामस्थांना जेवण दिले जाणार आहे. याशिवाय जवळच्या अनाथाश्रमांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. करोना महामारीच्या दृष्टीने ही ‘पूर्णपणे क्वारंटाइन बबल पार्टी’ असेल. तसेच, जारी केलेल्या अधिकृत प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 

हेही वाचा – खळबळजनकच..! टीम इंडियापासून वेगळं होताच रवी शास्त्रींचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘‘BCCIमधील काही लोकांना…”

वाढदिवसासाठी कडेकोट व्यवस्था

अंबानी कुटुंबाने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये असे म्हटले आहे, की सर्व पाहुण्यांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक आहे. ७ डिसेंबरपासून मुंबईत सर्व पाहुण्यांची दररोज चाचणी केली जात आहे. या चाचण्या आमच्या टीमद्वारे केल्या जातील. निगेटिव्ह आढळल्यानंतर, त्यांना अंबानींनी बुक केलेल्या खासगी जेटद्वारे जामनगरला नेले जाईल आणि वाढदिवसाच्या वेळेपर्यंत सर्वांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जाईल.

पृथ्वीसाठी नेदरलँड्सहून मागवलीत खेळणी

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही पार्टी क्वारंटाइन बायो बबलमध्ये असेल. मुलांना खेळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. श्लोका अंबानीने तिच्या छोट्या राजकुमारासाठी नेदरलँड्समधून खेळणी आणली आहेत, तर इटली आणि थायलंडमधील आंतरराष्ट्रीय शेफ पाहुण्यांसाठी डिशेस तयार करतील. एवढेच नव्हे, तर जामनगरमधील अनाथाश्रमांना भेटवस्तू आणि खेळणी पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.