भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की क्रिकेटच्या चाहत्यांना मेजवानीच असते. रविवारी १६ तारखेला पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. यंदाचा फादर्स डे १६ तारखेला असून त्याच दिवशी भारत-पाकमध्ये क्रिकेटयुद्ध रंगणार आहे. रविवारी फादर्स डेला भारत पाकिस्तानचा पराभव करून बदला घेणार का? २०१७ मध्ये फादर्स डेच्या दिवशी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या फादर्स डेला भारत पराभवचा वचपा काढणार का? अशी चर्चा रंगली आहे.

२०१७ मध्ये १८ जून रोजी फादर्स डे होता. त्याच दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बाप-बेटा अशी चर्चा रंगली होती. तसे पाहता भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्यापूर्वी आणि नंतर बाप आणि मुलगा यावर चर्चा सुरूच असते.

२०१७ मध्ये चॅम्पिन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने १८० धावांनी भारताचा मानहाणीकारक पराभव केला होता. या सामन्यात भारताची भक्कम फलंदाजी अपयशी ठरली होती. ओव्हलवर झालेल्या या मानहाणीकारक पराभवचा वचपा भारताने काढावा अशी चाहत्यांची इच्छा असणार आहे.

सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान चाहत्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष शिघेला पोहचला आहे. दोन्ही संघाचे चाहते आपापल्या संघाला पाठिंबा दर्शवत आहेत. जाहीरात, मिम्सच्या माध्यमांतून आपल्या संघाला पाठिंबा देत आहेत.

विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये १६ तारखेला ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे चाहतेही या सामन्याची तेवढ्याच अतुरतेने वाट पाहत आहेत.रविवारी मँचेस्टरमध्ये सामना अपेक्षित असला तरी पावसामध्ये सामना वाहून जाण्याची शक्यता आहे. जर हा सामना झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल. भारत पाकिस्तान संघांमधला सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावं असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा असंच सगळ्यांना वाटत असेल यात काही शंका नाही.