scorecardresearch

धक्कादायक! दीपक चहरच्या पत्नीला लाखोंचा चुना लावत दिली जीवे मारण्याची धमकी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Threat to Jaya Bhardwaj: भारतीय क्रिकेटर दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजची दहा लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दीपकचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Jaya Bhardwaj by defrauding her of 10 lakhs
दीपक चहर आणि त्याची पत्नी (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

क्रिकेटपटू दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. वृत्तानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने तिच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी माजी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही रक्कम डीलसाठी देण्यात आली होती, मात्र जयाने पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने तिला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.

वृत्तानुसार, दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, पारीख स्पोर्ट्स, हैदराबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जयाकडून करारासाठी १० लाख रुपये घेतले होते. जे त्यानी परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची एफआयआरमध्ये नावे आहेत.

दीपक चहरचे कुटुंब आग्राच्या शाहगंज येथील मान सरोवर कॉलनीत राहते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. करारानुसार, ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जयाकडून १० लाख रुपये घेतले होते, परंतु ते अद्याप परत केलेले नाहीत. इतकंच नाही तर वृत्तानुसार, पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ तर केलीच पण जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.

हेही वाचा – दीपक चहरच्या डोळ्यादेखत माकडाने पळवली भलतीच गोष्ट; VIDEO होतोय व्हायरल

दीपक चहर हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याचबरोबर तो आयपीएल संघ सीएसकेचादेखील भाग आहे. त्याला आयपीएल २०२२मध्ये सीएसकेने १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पंरतु दीपक दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 17:21 IST