Tilak Varma Breaks Virat Kohli Record: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या टी सामन्यात भारतीय २४९ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान संजू सॅमसनने ८२ धावांची खेळी करून दमदार सुरुवात करून दिली. तर पुन्हा एकदा तिलक वर्माने ४४ धावांची खेळी करून फिनिशिंग टच दिला. या खेळीच्या बळावर त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. आपल्या टी-२० कारकिर्दीतील १७५ सामन्यातील १६६ डावात ४१. ५७ च्या सरासरीने ५०३१ धावा केल्या आहेत. यासह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत केएल राहुल अव्वल स्थानी आहे. केएल राहुल भारतीय टी-२० संघातून बाहेर आहे, पण टी-२० क्रिकेटमध्ये अजूनही त्याचा दबदबा आहे. केएल राहुलने अवघ्या १४३ डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. केएल राहुलने आतापर्यंत ८७१८ धावा केल्या आहेत.
तिलक वर्मा आणि केएल राहुलसह शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासारख्या फलंदाजांचा देखील या यादीत समावेश आहे. अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे तो या यादीत असणं साहजिक आहे. पण केएल राहुल आणि शुबमन गिलसारखे फलंदाज देखील या यादीत पुढे आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे भारतीय फलंदाज
केएल राहुल -१४३ डावात
ऋतुराज गायकवाड – १४५ डावात
शुबमन गिल – १५४ डावात
अभिषेक शर्मा – १६५ डावात
तिलक वर्मा – १६६ डावात
भारतीय संघाचा पराभव
या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४४ आणि इशान किशनने ४३ धावा केल्या. भारतीय संघाने २४९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून शे होपने नाबाद १०२ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजने ९ चेंडू शिल्लक ठेवून सामना आपल्या नावावर केला.
