Tilak Verma Cetury at Duleep Trophy 2024 India A vs India D: दुलीप ट्रॉफीमध्ये दुसऱ्या फेरीचे सामने खेळवले जात आहेत. या दुसऱ्या फेरीत सर्वच भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. अनंतपूर येथे भारत ए आणि भारत डी यांच्यातील सामन्यात भारताचा मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाचा तारणहार तिलक वर्माने शानदारी शतकी खेळी केली. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारत ए संघाचा सलामीवीर प्रथम सिंगने शानदार शतक झळकावले आणि त्यानंतर लगेचच तिलक वर्मानेही आपले शतक झळकावले.

दुलीप ट्रॉफीतील पहिल्या डावात तिलक वर्मा फेल ठरला होता. पहिल्या डावात तिलक केवळ ३३ चेंडूत १० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. आयपीएल २०२४ नंतर तिलक जवळपास ४ महिने मैदानापासून दूर राहिला आणि आता तो दुलीप ट्रॉफीमध्ये परतल्याने पहिल्या डावात फ्लॉप ठरला. भारत ए संघाने पहिल्या डावात ८ गडी गमावून २८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत डी संघ अवघ्या १८३धावांत गारद झाला.

हेही वाचा – Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटूच्या अभिनेत्री सासूबाईंचा विराटबरोबर सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

मुंबई इंडियन्सचा तारहणहार तिलक वर्माचे शानदार शतक

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत ए संघाने स्कोअरबोर्डवर १ बाद ११५ अशी धावसंख्या नोंदवली होती. तिसऱ्या दिवशी प्रथम सिंहला बरोबर मैदानात तिलक वर्मा नवा फलंदाज म्हणून आला आणि या दोघांनी भारत ए संघाच्या डावाची दणक्यात सुरूवात केली. प्रथमने दुसऱ्या दिवशीच आपले अर्धशतक पूर्ण केले होते, त्यामुळे तिसऱ्या दिवशी त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला जास्त वेळ लागला नाही. दरम्यान, तिलक वर्मानेही हळूहळू आपल्या खात्यात धावांची भर घालण्यास सुरुवात केली.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

VIDEO: तिलक वर्माच्या शतकावर आवेश खानचं सेलिब्रेशन

तिलक वर्माने दोन धावा करत आपले शतक पूर्ण केले. हे पाहताचा ड्रेसिंग रूममधील सर्वांनी उभं राहून त्याचं कौतुक केलं. तर भारत ए संघाचा भाग असलेल्या आवेश खानने तिलकचे शतक पूर्ण होताच ड्रेसिंग रूममधून त्याचं खास सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

तिलक वर्माचं अर्धशतक आणि शतकी कामगिरीनंतर एक स्पेशल सेलिब्रेशन असतं, हे सेलिब्रेशन तो त्याची बेस्ट फ्रेंड असलेल्या समायरा शर्मासाठी करतो. समायरा शर्मा ही भारताचा कर्णधार रोहित शर्माची लेक आहे. मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला तिलक वर्मा आणि समायरा शर्माची खूपच गट्टी आहे. तिलक वर्माने भारतासाठी खेळताना त्याच्या पहिल्या अर्धशतकानंतर सॅमी स्टाईल सेलिब्रेशन केलं होतं.

हेही वाचा – ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजाने चेंडूसह घडवला इतिहास, T20I मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

तिलक वर्माच्या शतकावर सूर्यादादाची पोस्ट

तिलक वर्माच्या शतकी कामगिरीवर सूर्यकुमार यादवच्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. सूर्यकुमार यादवचा आज वाढदिवस असून त्याने तिलक वर्माचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, बेस्ट बर्थडे गिफ्ट… दुखापतीनंतर जबरदस्त कमबॅक, कोस्टल रोड चांगला आहे असं म्हणत सूर्याने तिलकची मस्करीही केली आहेय पण याचा नेमका अर्थ कळलेला नाही.

तिलक वर्माच्या शतकावर सूर्यकुमार यादवची इन्स्टाग्राम स्टोरी