ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार टीम पेनने सेक्सटींग (Sexting Scandal) प्रकरणामध्ये नाव पुढे आल्यानंतर कर्णधार पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवारी सायंकाळी होबार्ट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम पेनने यासंदर्भातील माहिती दिल्याचं वृत्त क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटने दिलं आहे. आपल्या एका सहकाऱ्यासोबत खासगी संवाद साधताना वापरलेल्या अयोग्य भाषेमुळे वादात सापडल्यानंतर पेनने कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याची घोषमा केली. मार्च २०१८ मध्ये टीम पेनला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधार पदी नियुक्त करण्यात आलेलं. तो ऑस्ट्रेलियाचा ४६ वा कर्णधार ठरला होता.

“आज मी ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाच्या कसोटी क्रिकेटमधील कर्णधार पदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा करतोय. हा माझ्यासाठी फार कठीण निर्णय होता. पण हा निर्णय माझ्या दृष्टीने, माझ्या कुटुंबाच्या दृष्टीने आणि क्रिकेटच्या दृष्टीने महत्वाचा आहे,” असं टीम पेनने स्पष्ट केलं आहे.

नक्की पाहा हे फोटो >> राहुल द्रविडमधील ‘र’ अन् सचिन तेंडुलकरमधील ‘चिन’ = रचिन; जाणून घ्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रचं जवागल श्रीनाथ कनेक्शन

“मी हा निर्णय घेण्यामागे चार वर्षांपूर्वी माझ्या तत्कालीन सहकाऱ्यासोबत केलेला संवाद कारणीभूत आहे. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. मी या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य केलं आहे. मी यामधील तपासाला शक्य ती मदत केलीय. या तपासामध्ये तसेच क्रिकेट टास्मानियाच्या एचआर तपासामध्ये या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. असं असलं तरी मला या प्रकरणाचा पश्चाताप तेव्हाही होता आणि आताही आहे,” असं टीम पेन म्हणालाय.

नक्की वाचा >> दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”

“मी याबद्दल माझ्या पत्नीशी आणि कुटुंबाशी चर्चा केली. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि माफी यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मात्र हे प्रकरण मागे पडेल आणि मागील तीन ते चार वर्षांपासून मी ज्यापद्धतीने काम करतोय त्याच पद्धतीने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करु शकेल असं मला वाटलेलं, मात्र नुकतचं मला हे खासगी संभाषण सार्वजनिक केलं जाणार असल्याची माहिती मिळाली. २०१७ साली घडलेली ती गोष्ट ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून माझ्याकडून घडायला नको होती. मी या कृतीमधून माझ्या पत्नीला, कुटुंबाला आणि इतर कोणालाही दुखावलं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. या प्रकरणामुळे खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असेल तर मी माफी मागतोय,” असं टीम पेन म्हणाला आहे.

नक्की वाचा >> दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”

“तसेच कर्णधार पद सोडणं हा माझ्यासाठी योग्य निर्णय असून आता या क्षणापासून मी पद सोडत आहे. येणाऱ्या अॅशेज मालिकेआधी हे प्रकरण संघाच्या कामगिरीमध्ये अडसर ठरु नये अशी माझी इच्छा आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार ही जबाबदारी मला फार प्रिय आहे. माझ्या क्रीडा क्षेत्रातील आयुष्यामधील हा सर्वात मोठा सन्मान होता की मी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व केलं. मला पाठिंबा देणाऱ्या संघ सहकाऱ्यांचा मी आभारी आहे. या कालावधीमध्ये आम्ही जी कामगिरी केलीय त्याचा मला अभिमान आहे. मी त्यांचीही माफी मागतो. मी ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. माझ्या भूतकाळातील वागणुकीमुळे संघाच्या अॅशेजमधील कामगिरीवर परिणाम झाल्याबद्दल मला माफ करा. संपूर्ण क्रिकेट क्षेत्राला आणि चाहत्यांना माझ्या वागण्यामुळे निराशाजनक वाटलं असेल तर मला माफ करा,” असं टीम पेन म्हणाला आहे.

नक्की पाहा >> वॉर्नरप्रमाणे दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावण्याचा प्रयत्न त्याला पडला महागात; व्हिडीओ झालाय व्हायरल

ऑस्ट्रेलियन प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार टीम पेनने २०१७ साली संघाशी संबंधित एका महिला अधिकाऱ्याला अयोग्य भाषेमध्ये मेसेज केला होता.