Hardik Pandya Instagram Post: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या तुफान चर्चेत आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने ठसा उमटवला आहे. मैदानाबाहेर तो आपल्या लव्ह स्टोरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माहिका शर्माला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्याची खास पोस्टहार्दिक पांड्याने एक खास रोमँटिक पोस्ट शेअर करून माहिका शर्माला शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघेही मस्ती करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओला हार्दिकने खास कॅप्शनही दिलं आहे. त्याने कॅप्शन देत लिहिले, “माझ्या राजकुमारीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..२५ वर्षांपूर्वी या जगात आल्याबद्दल धन्यवाद.”हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये हार्दिक आणि माहिका हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. दोघेही मुंबईत विमानतळावर एकत्र दिसून आले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा हे दोघेही एकत्र फिरायला देखील केले होते. या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा आहे तरी कोण?

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी माहिका शर्मा ही मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ती फॅशन आणि फिटनेसचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर ५ लाख ३० हजारांहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

माहिकाचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण झालं आहे. तिने दिल्लीतील नेव्ही चिल्ड्रन्स स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिने इकॉनॉमिक्स आणि फायनान्समधून आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने इंटर्नशिप देखील केली आहे