सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मिळवणाऱ्या एम.सी. मेरी कोम (५१ किलो) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला कोलंबियाच्या तिसर्‍या मानांकित इंग्रीट वलेन्सियाकडून मेरी कोमला पराभव पत्करावा लागला. महिला ५१ किलो गटात कोलंबियाच्या इन्ग्रिट वलेन्सियाकडून पराभव झाल्याने भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे.

पहिल्या फेरीत मेरीला कोलंबियाच्या बॉक्सरकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला, तर दुसर्‍या फेरीत भारतीय मेरीने जोरदार पुनरागमन करत ३-२ असा विजय मिळविला. तर, तिसऱ्या फेरीत व्हॅलेन्सियाने केवळ पुनरागमन केले नाही तर सामना ३-२ ने जिंकला.

मेरी कोमने याआधी दोन वेळा कोलंबियन बॉक्सरचा सामना केला होता आणि दोन्ही सामने जिंकले होते.  ज्यामध्ये २०१९ च्या जागतिक अजिंक्यपदांच्या उपांत्यपूर्व फेरीचा समावेश होता.

मेरी कोमने पराभूत झाल्याने ऑलिम्पिकची उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची संधी गमावली आहे. ही तिचा शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा होती. या पराभवाने मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला. त्याचबरोबर भारताच्या पदकाची मोठी आशाही संपली. ३८ वर्षीय मेरी कोम सहा वेळा विश्वविजेते असून ती भारताची महान महिला बॉक्सर आहे. मेरी कोम सामन्यानंतर भावनिक दिसत होती. रेफरीने कोलंबियन बॉक्सरला विजेता घोषित केल्यानंतरही सामन्याचा निकाल जाहीर झाल्यावर तिने आनंद व्यक्त केला. या दरम्यान मेरी कोम सतत हसत होती. सामन्यानंतर ती खूप थकलेली होती पण तरीही तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला जोरदार मिठी मारली आणि विजयाबद्दल तिचे अभिनंदन केले.