पहिल्या सुवर्णपदकाची प्रतीक्षा!

२००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने ७५ किलो वजनी गटात भारतासाठी या क्रीडाप्रकारातील पहिले पदक जिंकले.

पॅरिस येथे १९००मध्ये भारताचे ऑलिम्पिकमध्ये पदार्पण झाले. त्यानंतर १२१ वर्षे उलटली तरीही बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील भारताच्या पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाचा शोध सुरूच आहे. यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या एम. सी. मेरी कोम, अमित पांघल यांच्यासह भारताच्या एकूण नऊ शिलेदारांपैकी एक जण तरी हा पराक्रम करेल, अशी आशा आहे.

इतिहास

भारतात आजही बॉक्सिंगला ठरावीक भागांतच उत्तम प्रतिसाद लाभतो. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पहिल्या बॉक्सिंगपटूला खेळताना पाहण्यासाठी १९४८पर्यंत वाट पाहावी लागली. मनोज पिंगळे, डिंको सिंग, गुरचरण सिंग यांसारखे प्रतिभावान बॉक्सिंगपटू भारताने घडवले. अखेर २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदर सिंगने ७५ किलो वजनी गटात भारतासाठी या क्रीडाप्रकारातील पहिले पदक जिंकले. पुढे मेरी कोमने २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली महिला बॉक्सिंगपटू ठरण्याचा मान मिळवला. मेरीची कामगिरी भारतातील बॉक्सिंगचे नशीब पालटणारी ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अपेक्षा

आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल आणि सहा वेळची जगज्जेती मेरी कोम यांच्याकडून संपूर्ण देशवासीयांना पदकाची अपेक्षा आहे. विशेषत: ३८ वर्षीय मेरीचे हे कारकीर्दीतील अखेरचे ऑलिम्पिक ठरण्याची शक्यता असल्याने भारताला बॉक्सिंगमधील पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावून देण्याची मदार तिच्यावर असेल. याशिवाय सलग दोन आशियाई सुवर्णपदके कमावणारी पूजा राणीसुद्धा पदकाची दावेदार आहे. विकास कृष्णन, सिमरनजीत कौर धक्कादायक कामगिरीची नोंद करू शकतात.

आतापर्यंतची पदके

सुवर्ण ० रौप्य ० कांस्य २ एकूण २

पदकविजेते – विजेंदर सिंग

(२००८, बीजिंग) कांस्यपदक

एम. सी. मेरी कोम – (२०१२, लंडन) कांस्यपदक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo 2020 gold medal prediction in boxing for india at the tokyo olympics zws

Next Story
विजयी भव !