भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं असून इतिहास रचला आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव करत ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली. दरम्यान यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.

Tokyo 2020 Hockey: ४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव

भारताकडे ५-४ अशी आघाडी असताना काही करून बरोबरी करण्याच्या उद्देशानं जर्मनीनं आपलं आक्रमण वाढवण्याचा निर्णय घेतला. भारताची बचावफळी भेदता येत नसल्याचे व अनेक पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येत नसल्याचे बघून जर्मनीनं गोलकीपरशिवाय खेळून एक आक्रमक खेळाडू खेळवण्याचा निर्णय सामना संपायला काही मिनिटं असताना घेतला. त्यांचा हा निर्णय अचूक ठरण्याची शक्यताही निर्माण झाली. परंतु शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताच्या गोलकीपरनं व बचावफळीनं अप्रतिम बचावाचं दर्शन घडवलं व जर्मनीचे मनसुबे धुळीला मिळवले आणि कांस्यपदकावर नाव कोरलं.

Tokyo 2020 Hockey: …अन् शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताने सामना जिंकला; ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला

झालं असं की, सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होता. गोलकीपरशिवाय खेळणाऱ्या जर्मनीला सामन्यातील आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त वेळ किंवा पेनल्टी शूट आऊटपर्यंत सामना नेण्यासाठी सामनाबरोबरीत सोडवणं आवश्यक होतं. याच प्रयत्नात असतानाच अगदी सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास ४१ वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणाऱ्या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. हा गोल झाला असता तर सामना अतिरिक्त वेळेत गेला असता आणि तिथेही गोल झाला नसता तर पेनल्टी शूट आऊटने विजेता निश्चित करण्यात आला असता. मात्र भारतीय संघाने आपला संयम कायम राखत सामना ५-४ च्या फरकाने जिंकला.